advertisement

Job Opportunity: नोकरी शोधताय? पुण्यात महिला आणि मुलींसाठी मोठी संधी, लगेच करा अर्ज

Last Updated:

Job Opportunity: या मेळाव्याचा उद्देश पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.

Job Opportunity: नोकरी शोधताय? पुण्यात महिलांसाठी मोठी संधी, लगेच करा अर्ज
Job Opportunity: नोकरी शोधताय? पुण्यात महिलांसाठी मोठी संधी, लगेच करा अर्ज
पुणे: नोकरीच्या शोधात असणाऱ्या महिला आणि मुलींसाठी मोठी संधी आहे. पिंपरी चिंचवड येथे महिलांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात दहावी आणि बारावी पास महिलांसाठी थेट नोकरीची संधी आहे, तर पदवीधर महिलाही यामध्ये सहभागी होऊ शकतात. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि यशस्वी अॅकॅडमी फॉर स्किलिंग, यशस्वी भवन यांच्या संयुक्त विद्यमाने 18 मार्चला चिंचवड येथे सकाळी 10 वाजता महिलांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांसाठी पुण्यात रोजगार मेळावा
या मेळाव्यात पुणे जिल्ह्यातील विविध उद्योग, कंपन्या आणि व्यावसायिक सहभागी झाले आहेत. त्यांच्याकडून 200 पेक्षा जास्त पदे भरवण्यात येणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांची पात्रता 10 वी, 12 वी, डिप्लोमा, बी.ई., पदवीधर, तसेच मशीन ऑपरेटिंग, प्रोडक्शन, ट्रेनी अशा विविध क्षेत्राचा समावेश असणार आहे. याशिवाय, अप्रेंटिस योजनेअंतर्गतही ट्रेनी पदांसाठी संधी दिल्या जात आहेत. या मेळाव्याचा उद्देश पुणे जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे ज्या महिला नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे.
advertisement
इच्छुक महिला उमेदवारांनी अधिक माहिती आणि अर्जासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in  या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा. मेळाव्यासाठी येताना सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या छायांकित प्रती, अर्जाच्या प्रती तसेच ओळखपत्राची प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/करिअर/
Job Opportunity: नोकरी शोधताय? पुण्यात महिला आणि मुलींसाठी मोठी संधी, लगेच करा अर्ज
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement