दोनदा अपयश पण जिद्द नाही सोडली, पुण्याच्या आर्याने कंपनी सेक्रेटरी परीक्षेत मिळवलं यश, देशात 20 वी रँक
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या प्रवासात तिला अनेक अडचणींना समोर जावं लागलं. या परीक्षेत तिला दोनदा अपयशाचा देखील सामना करावा लागला, पण अखेर आपल्या जिद्दीच्या जोरावर तिने परीक्षा उत्तीर्ण करत देशात 20 क्रमांक मिळवला आहे.
पुणे : आपल्या स्वप्नांप्रती जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असल्यास या जगात कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकतं. हेच पुण्यातील आर्या शिनलकर दाखवून दिलंय. आर्याने कंपनी सेक्रेटरी सारख्या कठीण परीक्षेत देशात 20 वी रँक मिळवली आहे. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून आर्या या परीक्षेची तयारी करत होती. या प्रवासात तिला अनेक अडचणींना समोर जावं लागलं. या परीक्षेत तिला दोनदा अपयशाचा देखील सामना करावा लागला, पण अखेर आपल्या जिद्दीच्या जोरावर तिने परीक्षा उत्तीर्ण करत देशात 20 क्रमांक मिळवला आहे. तिच्या संपूर्ण प्रवासाविषयी तिने लोकल 18 ला माहिती दिली.
कंपनी सेक्रेटरी परीक्षेत देशात विसावी
आर्या शिनलकर हिने अवघ्या 22 व्या वर्षी कंपनी सेक्रेटरी सारख्या कठीण परीक्षेत देशात 20 वी रँक मिळवली आहे. आर्या मूळची कोथरूडची असून, सध्या भोसरीमध्ये वास्तवास आहे. ती अवघ्या तीन वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचे, अजय शांताराम शिनलकर यांचे, अपघाती निधन झाले. या कठीण परिस्थितीतही तिने हार मानली नाही. आजोबा विठ्ठल किसन ढोले आणि आई जयश्री यांच्या पाठबळावर तिने धैर्याने आणि चिकाटीने शिक्षण पूर्ण केले. आर्याने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण दिघी येथील गॅलक्सी इंग्लिश मीडियम स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर मॉडर्न कॉलेजमधून बारावी पूर्ण करून बी.बी.ए. फायनान्समध्ये पदवी मिळवली.
advertisement
आर्याला कंपनी सेक्रेटरी परीक्षांविषयी तिच्या कॉलेजच्या शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळाले. पदवीचे शिक्षण सुरू असतानाच आर्याने ऑनलाइन मार्गदर्शन घेत सी.एस या व्यावसायिक अभ्यासक्रमाची तयारी सुरू केली होती. सुरुवातीपासूनच तयारी केल्यामुळे आर्याने ही परीक्षा उत्तीर्ण केली. या प्रवासात तिला अपयशाचा देखील सामना करावा लागला. परंतु खचून न जाता तिने आपला अभ्यास चालू ठेवला आणि आयसीएसआयतर्फे घेतलेल्या परीक्षेत तिने संपूर्ण भारतातून 20 क्रमांक मिळवला. आई आणि आजोबांच्या पाठिंब्यामुळे मला हे यश मिळाल्याचं आर्याने सांगितलं.
advertisement
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 10:14 PM IST
मराठी बातम्या/करिअर/
दोनदा अपयश पण जिद्द नाही सोडली, पुण्याच्या आर्याने कंपनी सेक्रेटरी परीक्षेत मिळवलं यश, देशात 20 वी रँक









