Thane News: ठाण्यामध्ये गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल, कसा असेल मार्ग?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
ठाण्यामध्ये गुढीपाडवा सणानिमित्त नववर्ष स्वागतयात्रा काढली जाते. या स्वागत यात्रेनिमित्त ठाणे पोलिसांनी शहरात मुख्य रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये बदल केले आहेत.
ठाणे: ठाणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ठाण्यामध्ये गुढीपाडवा सणानिमित्ताने नववर्ष स्वागतयात्रा काढली जाते. या स्वागत यात्रेनिमित्त ठाणे पोलिसांनी 19 मार्चला, गुरूवारी शहरात वाहतुक बदल लागू केले आहेत. गुरूवारी सकाळी 5 वाजेपासून हे वाहतुक बदल लागू असतील. त्यामुळे जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी आपलं वाहन घेऊन घराबाहेर पडणार असाल, तर एकदा ही बातमी आवश्य वाचा. नेमकं कोणकोणत्या रस्त्यावर वाहतुकीसाठी बंदी केली आहे? कोणते पर्यायी मार्ग असणार आहेत? एकदा जाणून घेऊयात...
ठाणे शहरातील नौपाडा परिसरातील अनेक रस्ते गुढीपाडवा सणानिमित्त (19 मार्च- गुरूवार) नववर्ष स्वागतयात्रा काढली जाते, म्हणून वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. कारण वाहतूक विभागाने परिसरातील वाहतुक सुरळीत राहण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ठाणे पोलीसांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर कोणकोणत्या परिसरातील रस्त्यांची वाहतुक सुरू राहिल आणि बंद असेल? याची अपडेट शेअर केलेली आहे. ठाणे शहराचे वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, हे निर्बंध सकाळी 05:00 ते दुपारी 03:00 वाजेपर्यंत लागू राहतील.
advertisement
दि. 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा सणानिमित्त सकाळी 06:30 वा. कोपिनेश्वर मंदिर, ठाणे येथून ‘गुढीपाडवा आणि नववर्ष स्वागत यात्रा’ सुरू होणार असून सुमारे 4500 ते 5000 नागरिक सहभागी होणार आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी वाहतूक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन वाहतुकदारांना आणि नागरिकांना केले आहेत. दरम्यान, अनेक मुख्य रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश प्रतिबंधित केला गेला आहे. नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी आणि वाहतुकदारांची सुद्धा गर्दी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला ठाणे वाहतुक पोलिसांकडून देण्यात आला आहे.
advertisement
दि. १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ०६:३० वा. कोपिनेश्वर मंदिर, ठाणे येथून ‘गुढीपाडवा व नववर्ष स्वागत यात्रा’ सुरू होणार असून सुमारे ४५००–५००० नागरिक सहभागी होणार आहेत. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी वाहतूक सूचनांचे पालन करून सहकार्य करावे.#Thane #GudiPadwa #NavVarshaSwagatYatra pic.twitter.com/Aap2m13aYC
— ठाणे पोलीस.. Thane Police (@ThaneCityPolice) March 13, 2026
advertisement
डॉ. मुस चौकाकडून हॉटेल साई कृपाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना डॉ. मुस चौकामध्ये 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. या मार्गांवरील सर्व वाहनं जांभळी नाका आणि चिंतामणी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. राम मारूती रोडने गोखले रोडकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना बंदना टि पॉइंट येथे 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. गजानन महाराज चौकातून डावे वळण घेऊन दगडी शाळा चिंतामणी ज्वेलर्सच्या मार्गे वाहने पुढे आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतील. गोखले रोडकडून राम मारूती रोडने पु. ना. गाडगीळ चौककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मढवी हाऊस समोर 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. या मार्गावरील सर्व वाहनांना गोखले रोड, केम्ब्रिज, सत्यम कलेक्शन, पंटाळोदेवी मंदिर रोड, श्रद्धा वडापाव आणि पु.ना. गाडगीळ चौक येथे डावीकडे वळण घेऊन गजानन महाराज चौक मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत.
advertisement
तलाव पाळी, गडकरी सर्कलकडून डॉ. मुझ चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना गडकरी सर्कलमध्ये 'प्रवेश बंद' करण्यात येणार आहे. या मार्गावरील सर्व वाहनांना गडकरी सर्कल, दगडी शाळा, अल्मेडा चौक मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत. खोपट सिग्नलमार्गे अल्मेडा सिग्नलकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना अल्मेडा सिग्नलकडून वंदना टि पॉईंटकडे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे. या मार्गावरील सर्व वाहनांना उजवे वळण घेऊन टी.एम.सी. सर्कल नितीन जंक्शन मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकणार आहेत. ज्या पद्धतीने ठाणे पोलिसांनी कोणत्या रस्त्यावर प्रवेश बंदी आहे, कोणता रस्त्याचा पर्यायी रस्ता म्हणून वापर केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे नो पार्किंग परिसराची सुद्धा यादी जाहीर केलेली आहे. ठाण्यातील अनेक प्रमुख मार्गांची नो पार्किंग झोन म्हणून निवड केलेली आहे. यामुळे कदाचित वाहनधारकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
advertisement
ठाण्यातील कुठे- कुठे नो पार्किंग?
- चिंतामणी चौक ते गडकरी सर्कल तलावाची बाजू व सेंट जॉन स्कूल मागील बाजूस रस्त्याचे दोन्ही बाजूस वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.
- गजानन महाराज चौक ते गोखले रोड दरम्यान राम मारुती रोडवर रस्त्याचे दोन्ही बाजूस वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.
- साईकृपा हॉटेल ते एस.बी. आय. बँक कॉर्नर दरम्यान रस्त्याचे दोन्ही बाजूस वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.
advertisement
Location :
Thane,Thane,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 9:58 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Thane News: ठाण्यामध्ये गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल, कसा असेल मार्ग?






