advertisement

Jam Recipe : कलिंगड खाऊन झाल्यावर साल फेकू नका! या सोप्या पद्धतीनं काही मिनिटांत बनवा हेल्दी जॅम!

Last Updated:
Watermelon peels jam : उन्हाळ्यात घरामध्ये भरपूर प्रमाणात कलिंगड येतात. ती खाल्ली जातात. कलिंगड खाल्ल्यानंतर त्याच्या बियांचाही बरेच लोक वापर करतात. मात्र कलिंगडाच्या सालीचं काय? तुम्हाला माहितीये, कलिंगडाच्या सालीचाही तुम्ही खूप चांगल्या प्रकारे वापर करू शकता.
1/7
कलिंगड खाल्ल्यानंतर त्याच्या साली फेकू नका. कारण त्यापासून तुम्ही हेल्दी आणि अत्यंत टेस्टी असा जॅम बनवू शकता. मुलांना ब्रेडसोबत जॅम खायला आवडतं. अशावेळी त्यांना बाहेरचा अनेक प्रिझर्व्हेटिव्ह्स असलेला जॅम न देता, हा घरी बनवलेला हेल्दी जॅम खायला द्या.

2/7
कलिंगडाच्या सालीपासून जॅम बनवण्यासाठी तुम्हाला खूप कमी साहित्य आणि वेळ लागतो. कलिंगडाच्या जमेची ही रेसिपी jyotiimahawar या इंस्टाग्राम हँडलवर दिली गेली आहे.

3/7
कलिंगडाची साल हृदयाचे आरोग्य सुधारते. करा या सालीमध्ये अमिनो ॲसिड भरपूर प्रमाणात असतात, जे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात आणि नियमित खाल्ल्याने रक्तदाब कमी करण्यासाठी मदत करतात.

4/7
कलिंगडाच्या साली पचनक्रिया सुधारतात. कारण यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणावर असतं. यामुळे पचन सुधारतं, पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि आतड्यांचं आरोग्य सुधारतं.

5/7
कलिंगडाच्या सालीचा जॅम बनवण्यासाठी सर्वात आधी कलिंगडाच्या सालीचे बारीक बारीक तुकडे करा. कुकरमध्ये हे तुकडे आणि सोबत रंगासाठी बीटरुटचे काही तुकडे करून टाका.

6/7
आता कुकरमध्ये पाणी टाकून हे व्यवस्थित शिजवून घ्या. शिजवल्यानंतर हे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. आता हे बारीक केलेले मिश्रण गाळणीच्या साहाय्याने व्यवस्थित गाळून घ्या.

7/7
गाळलेले मिश्रण एका पॅनमध्ये टाका. त्यामध्ये थोडी साखर घालून गॅस सुरु करा आणि हे मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा. घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा. अशाप्रकारे तुमचे हेल्दी आणि टेस्टी जॅम तयार होईल. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement