advertisement

Mumbai Local : लोकलमध्ये ग्रुपवाल्यांची पुन्हा दादागिरी, प्रवाशांना ट्रेनमधून चढूनच दिलं नाही, पाहा VIDEO

Last Updated:

नालासोपारा स्थानकातून अनेक प्रवासी हे ग्रुपने प्रवास करतात.नंतर हेच प्रवासी जागा अडवतात आणि इतर प्रवाशांसोबत दादागिरीची भाषा करतात.कधी ट्रेनचा प्रवेशद्वारावर लटकतात आणि इतर प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवेश देत नाही.

Mumbai Local
Mumbai Local
Mumbai Local : मुंबई लोकलमधला प्रवास म्हटलं तर भांडण,धक्काबुक्की,मारामारी ही आलीच.मुंबईकरांसाठी हे रोजच झालं आहे. पण सकाळच्या सुमारास अनेक प्रवाशांचे ग्रुप हे सर्रास दादागरी करतात आणि इतर प्रवाशांना ट्रेनमध्येच प्रवेशच देत नाही. या ग्रुपवर अनेकदा कारवाई देखील झाली आहे,पण हे ग्रुप सुधरायच नाव घेत नाही आहे.आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत काही प्रवाशी हे गेटवर लटकले आहेत आणि इतर प्रवाशांना ट्रेनच्या आत प्रवेश करायचा आहे. पण ते त्यांच्यासोबत दादागिरी करतायत.त्यामुळे वसई विरारच्या ट्रेनमध्ये पुन्हा ग्रुपवाल्यांच्या दादागिरीचा व्हिडिओ समोर आला आहे. यानंतर संबंधीत ग्रुपवर कारवाईची मागणी होत आहे.
नालासोपारा स्थानकातून अनेक प्रवासी हे ग्रुपने प्रवास करतात.नंतर हेच प्रवासी जागा अडवतात आणि इतर प्रवाशांसोबत दादागिरीची भाषा करतात.कधी ट्रेनचा प्रवेशद्वारावर लटकतात आणि इतर प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवेश देत नाही. अशीच घटना आता समोर आली आहे. तुम्ही व्हिडिओ पाहू शकता,या व्हिडिओत दावा केला जातो आहे की ही विरारची घटना आहे. पण ही घटना वसईचे असल्याचे बोलले जात आहे. वसईच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरची घटना आहे.
advertisement












View this post on Instagram























A post shared by Vasaivirar Buzz (@vvbuzzz)



advertisement
या घटनेत काही प्रवाशी हे ट्रेनचा गेट अडवून बसले आहे.तर इतर प्रवाशांना आत प्रवेश करायचा आहे.पण हे लटकलेले प्रवाशी त्यांना आत प्रवेशच करून देत नाही आहे. विशेष म्हणजे नुसता प्रवेश देत नाहीयेत तर दादागिरी भाषा करताना दिसत आहेत. तसेच धक्के मारतात, अंगावर येतात, अशा प्रकारची ही दादागिरी सूरू आहे.अशाप्रकारच्या दादागिरीवर कुठेतरी चाप बसणे गरजेचे आहे.नाहीतर ही दादागिरी अशीच सूरू राहिल.
advertisement
ग्रुप वाल्यांच्या या दादागिरीमुळे इतक प्रवाशी प्रचंड त्रस्त आहेत.त्यांना ना धड आत शिरायला मिळत ना आता बसायला मिळत.त्यामुळे संबंधित दादागिरी करणाऱ्या ग्रुपवर कारवाई करावी अशी मागणी सर्व सामान्य प्रवाशी करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local : लोकलमध्ये ग्रुपवाल्यांची पुन्हा दादागिरी, प्रवाशांना ट्रेनमधून चढूनच दिलं नाही, पाहा VIDEO
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement