advertisement

सुट्टी रिजेक्ट केल्याने तळपायाची आग मस्तकात गेली, केबिनमध्ये घुसून मॅनेजरचा मर्डर!

Last Updated:

सुट्टी मंजूर केली नाही म्हणून कर्मचाऱ्याने केबिनमध्ये घुसून मॅनेजरची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

सुट्टी रिजेक्ट केल्याने तळपायाची आग मस्तकात गेली, केबिनमध्ये घुसून मॅनेजरचा मर्डर!
सुट्टी रिजेक्ट केल्याने तळपायाची आग मस्तकात गेली, केबिनमध्ये घुसून मॅनेजरचा मर्डर!
सुट्टी मंजूर केली नाही म्हणून कर्मचाऱ्याने केबिनमध्ये घुसून मॅनेजरची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पंजाब ऍण्ड सिंध बँकेचा गार्ड रवींद्र हुड्डा याने बँकेच्या मॅनेजरला गोळी मारली, यानंतर बँक मॅनेजरला गंभर अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचार सुरू असताना मॅनेजरचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गार्ड रवींद्र हुड्डा आणि शीशपाल याला अटक केली आहे.
मृत्यू झालेल्या बँक मॅनेजरचं नाव अभिषेक शर्मा आहे. 36 वर्षांचा अभिषेक शर्मा मागच्या एका वर्षापासून ब्रँचमध्ये होता. रवींद्र हुड्डा हा मागच्या 3 महिन्यांपासून बँकेत गार्डची नोकरी करत होता. रवींद्र हुड्डा मागच्या बऱ्याच दिवसांपासून सुट्टीची मागणी करत होता, पण कामाचा लोड जास्त असल्यामुळे मॅनेजर अभिषेक शर्माने त्याला सुट्टी द्यायला नकार दिला. सुट्टी मिळत नसल्यामुळे दोघांमध्ये मागच्या काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला होता.
advertisement

केबिनमध्ये घुसून गोळीबार

सोमवारी दुपारी 1.45 वाजण्याच्या सुमारास अभिषेक आणि रवींद्र यांच्यात पुन्हा एकदा वाद झाले, यानंतर बँकेमध्येच रवींद्रने अभिषेकला गोळी झाडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अभिषेकने सुट्टी नाकारल्यानंतर रवींद्रचा राग अनावर झाला आणि त्याने थेट केबिनमध्ये घुसून अभिषेकच्या छातीवर गोळी झाडली. गोळीच्या आवाजाने बँकेमध्ये एकच घबराट पसरली. बँकेतील कर्मचारी आणि ग्राहक स्वत:चा जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळायला लागले.
advertisement
गोळी लागल्यानंतर बँक मॅनेजर अभिषेक जागेवरच कोसळला. बँक मॅनेजरला गोळी मारल्यानंतर गार्ड रवींद्र हुड्डा न डगमगता बंदूक हातात घेऊन बँकेतून बाहेर पडला. बँकेबाहेर असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही पूर्ण घटना रेकॉर्ड झाली आहे. मॅनेजरला गोळी मारल्यानंतर रवींद्र त्याचा सहकारी शीशपालला घेऊन तिथून फरार झाला. तर दुसरीकडे बँक कर्मचारी जखमी अभिषेकला घेऊन रुग्णालयात गेले.
advertisement

आरोपी गार्डला अटक

बँक कर्मचारी बाईकवरून अभिषेकला रुग्णालयात घेऊन गेले, पण डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही अभिषेकला वाचवण्यात यश आलं नाही. याप्रकरणी पोलिसांनी अभिषेकचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. दुसरीकडे पोलिसांनी आरोपी गार्ड रवींद्र हुड्डा आणि त्याचा सहकारी शीशपाल याला अटक केली आहे. आरोपी रवींद्र हुड्डाकडून पोलिसांनी गुन्ह्यासाठी वापरलेली पिस्तुल जप्त केली आहे. गाझियाबादच्या जवळ असलेल्या लोनी बॉर्डर भागातील बलराम नगर येथील पंजाब ऍण्ड सिंध बँकेमध्ये घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
सुट्टी रिजेक्ट केल्याने तळपायाची आग मस्तकात गेली, केबिनमध्ये घुसून मॅनेजरचा मर्डर!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement