advertisement

'CSK चा खेळाडू धोनीसाठी बनवतो शिशा'... IPL आधीच हुक्क्याच्या आरोपांचा धुरळा!

Last Updated:

आयपीएल 2026 ला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे, पण पाच वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेला चेन्नई सुपरकिंग्सचा दिग्गज खेळाडू एमएस धोनी हुक्क्याच्या वादावरून पुन्हा एकदा वादात सापडला आहे.

'CSK चा खेळाडू धोनीसाठी बनवतो शिशा'... IPL आधीच हुक्क्याच्या आरोपांचा धुरळा!
'CSK चा खेळाडू धोनीसाठी बनवतो शिशा'... IPL आधीच हुक्क्याच्या आरोपांचा धुरळा!
मुंबई : आयपीएल 2026 ला 28 मार्चपासून सुरूवात होणार आहे, पण पाच वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेला चेन्नई सुपरकिंग्सचा दिग्गज खेळाडू एमएस धोनी हुक्क्याच्या वादावरून पुन्हा एकदा वादात सापडला आहे. सीएसकेकडून खेळलेला इंग्लंडचा खेळाडू सॅम बिलिंग्स याने एका पॉडकास्टवर धोनीच्या हॉटेल रूममध्ये एक खास हुक्का मॅन आहे, ज्याचं एकमेव काम धोनीसाठी हुक्का तयार करणं आहे, असा दावा केला आहे. हा माणूस सीएसकेचाच डावखुरा फास्ट बॉलर खलील अहमद आहे, असं बिलिंग्स म्हणाला आहे.

धोनीची रूम कायम उघडी

धोनीची हॉटेल रूम ही टीमसाठी 24X7 उघडी असते. धोनीला त्याच्या लोकप्रियतेमुळे हॉटेलमधील बार किंवा कॅफेमध्ये जाणं शक्य होत नाही, त्यामुळे तो खोलीमध्येच हुक्का पार्टीचं आयोजन करतो. धोनीच्या खोलीमध्ये एका कोपऱ्यात हुक्का ठेवलेला असतो आणि नवीन खेळाडू त्याच्यासोबत आरामात बसून गप्पा मारू शकतात, असं बिलिंग्स म्हणाला आहे.
advertisement
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते एका तासाच्या हुक्का सेशनमध्ये 100 सिगारेटइतका धूर श्वासावाटे आत जाऊ शकतो. हुक्क्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कोळशातील कार्बन मोनॉक्साईड आणि जड धातूंमुळे खेळाडूंच्या फिटनेसवरही परिणाम होऊ शकतो.

इरफान पठाणनेही केले होते आरोपांनी

टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाण यानेही एका मुलाखतीमध्ये हुक्का पार्टीचा उल्लेख केला होता, ज्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. मला कुणाच्या रूममध्ये जाऊन हुक्का लावण्याची सवय नाही, असं इरफान पठाण म्हणाला होता. तसंच धोनी हुक्का ओढत असल्याचा एक व्हिडिओ क्लिपही सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'CSK चा खेळाडू धोनीसाठी बनवतो शिशा'... IPL आधीच हुक्क्याच्या आरोपांचा धुरळा!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement