advertisement

Shocking Incident : बाप रे! भांडूप स्थानकात मोठा अनर्थ टळला; एसी लोकलच्या मोटरमनची एक चूक अन् प्रवाशांचा थरकाप

Last Updated:

Bhandup Station Shocking Incident : भांडूप स्थानकावर एसी जलद लोकलच्या मोटरमनच्या चुकीमुळे एक मोठा अपघात होता होता टळला आहे. ही घटना झाली असती तर अनेक प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.

भांडूप स्थानकावर एसी लोकलचा थांबा चुकल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण
भांडूप स्थानकावर एसी लोकलचा थांबा चुकल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण
मुंबई : मध्य रेल्वेवरील भांडूप स्थानकात काल एसी लोकलमधील मोटरमनच्या एका क्षुल्लक चुकीमुळे मोठा अनर्थ होतो होता टळला आहे. ज्यामुळे रेल्वेमधील प्रवासी आणि स्थानकात उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
मोठा अपघात थोडक्यात टळला
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही काळापासून एसी लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गावर धावतात. त्यात काही जलद एसी लोकल काही स्थानकाचे थांबे घेत मुख्य स्थानकात पोहचतात. कालही मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सकाळी 8.56 ला जलद एसी लोकल कल्याण दिशेला रवाना झाली होती.
सीएसटीवरुन निघाल्यानंतर कल्याण दिशेने जाताना काही स्थानकावर याचा थांबा ठरलेला होता,ज्यात भांडूप स्थानकाचाही समावेश होता. मात्र भांडूप स्थानकावर आल्यानंतरही ही एसी जलद लोकल वेगात होती. कारण या स्थानकावर थांबा होता ते मोटरमन विसरला होता.पण काही क्षणात चूक लक्षात येताच लगेचच मोटारमनने लोकल थांबवली.
advertisement
शेवटी घडला थरकाप उडवणारा प्रकार
मात्र वेगाने असलेली एसी लोकलने तोपर्यंत पुढच्या दोन डब्ब्यांनी प्लॅटफॉर्मवरील निश्चित थांबा ओलाडंला होता. प्लॅटफॉर्म सोडून लोकल दोन डब्बे पुढे गेल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी प्लॅटफॉर्मपासून पुढे गेलेल्या डब्यातील प्रवासी अन्य डब्यांतून प्लॅटफॉर्मवर उतरले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Shocking Incident : बाप रे! भांडूप स्थानकात मोठा अनर्थ टळला; एसी लोकलच्या मोटरमनची एक चूक अन् प्रवाशांचा थरकाप
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement