IPL 2026 : अभिषेक- ईशानसारखे 'बकासूर', पॅट कमिन्ससारखा खवटा बॉलर; पण काव्याची एक चूक सनरायझर्सला महागात पडणार!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Sunrisers hyderabad Weakness in IPL 2026 : मागील वर्षी सर्व 10 टीम्समध्ये हैदराबादने फिरकीपटूंकडून सर्वात कमी म्हणजे केवळ 27.2 टक्के ओव्हर्स टाकल्या होत्या. हैदराबादसाठी स्पिनर्स व्हिलन ठरले होते.
IPL 2026 biggest challenge for SRH : आपल्या बॅटिंगने तांडव घालणाऱ्या काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबाद संघासाठी मागील आयपीएल हंगाम चांगला राहिला नाही. मागील हंगामात त्यांना प्लेऑफमध्ये देखील पोहोचता आलं नव्हतं. अशातच आता सनरायझर्स हैदराबादकडे यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचवण्याची संधी आहे. मात्र, एसआरएचला मागील वर्षी केलेली एक चूक महागात पडू शकते. पॅट कमिन्सला प्लॅन तयार करूनच मैदानात उतरावं लागले.
स्पिनर्सकडून सर्वात कमी ओव्हर
सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) फिरकीपटूंसाठी मागील सीझन विसरण्यासारखा ठरला असला, तरी IPL 2026 साठी मात्र हैदराबादने 'स्पिनर्स प्लॅन' तयार केला आहे. मागील वर्षी सर्व 10 टीम्समध्ये हैदराबादने फिरकीपटूंकडून सर्वात कमी म्हणजे केवळ 27.2 टक्के ओव्हर्स टाकल्या होत्या. हैदराबादसाठी स्पिनर्स व्हिलन ठरले होते. अशातच आता यंदाच्या हंगामात हैदराबादला यावर मात करावी लागणार आहे. हैदराबादने यासाठी युवा स्टार स्पिनरला संघात जागा दिली आहे.
advertisement
तीन स्पिनर्सवर बोली लावली
संघाची फिरकीची ही कमतरता भरून काढण्यासाठी मॅनेजमेंटने या लिलावात अनुभवी नावांपेक्षा युवा आणि 'मिस्ट्री' स्पिनर्सवर मोठी बोली लावली आहे. केरेन्स फुलाटर, अमित कुमार, शिवांग कुमार या तीन स्पिनर्सला हैदराबादने संघात घेतलंय खरं पण त्यांच्याकडे अनुभवी स्पिनर्सची कमतरता आहे. कमिन्डू मेंडिस वगळता त्यांना फास्टर्स बॉलर्सवर अवलंबून रहावं लागतंय. सनरायझर्सच्या स्पिनर्सचं नेतृत्व विदर्भाचा डावखुरा फिरकीपटू हर्ष दुबे करण्याची शक्यता आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तब्बल 69 विकेट्स घेण्याचा कारनामा केल्यानंतर तो आता ऑरेंज आर्मीसाठी मुख्य अस्त्र ठरणार आहे. काव्याला मोठ्या स्पिनर्सवर बोली लावता आली नाही, इथंच मोठी चूक झाली.
advertisement
लियम लिव्हिंगस्टोन ठरणार गेमचेंजर?
हर्ष दुबेच्या समावेशामुळे SRH ला केवळ एक अचूक फिरकीपटूच मिळाला नाही, तर खालच्या फळीत बॅटिंगचा एक सक्षम पर्यायही उपलब्ध झाला आहे, ज्यामुळे टीमच्या संतुलनात मोठी सुधारणा होईल. दुसरीकडे, लेग-स्पिनर झिशान अंसारी हा मधल्या ओव्हर्समध्ये विकेट मिळवून देणारा हुकुमी एक्का ठरू शकतो. विजय हजारे ट्रॉफीमध्ये 21 विकेट्स घेऊन त्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे. टीमने परदेशी खेळाडूंच्या कोट्यात लियम लिव्हिंगस्टोनला 13 कोटी रुपयांना खरेदी करून एक मोठी खेळी खेळली आहे. लिव्हिंगस्टोन हा केवळ एक स्फोटक बॅटर नाही, तर तो लेग-स्पिन आणि ऑफ-स्पिन दोन्ही टाकू शकतो.
advertisement
गोलंदाजीच्या जोरावरही चॅम्पियन बनण्याचे स्वप्न
दरम्यान, सनरायझर्सकडे ऑलराऊंडरची कमतरता नाही पण स्पेशलिस्ट खेळाडू कमी असल्याने, खासकरून स्पिनर्स, त्यामुळे हैदराबादसाठी यंदाचं वर्ष देखील चॅलेन्जिंग असणार आहे. हैदराबादची टीम केवळ बॅटिंगच्या जोरावर नाही, तर गोलंदाजीच्या जोरावरही चॅम्पियन बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते. त्यामुळे आता पॅट कमिन्सला आक्रमक रणनितीने मैदानात उतरावं लागेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 9:10 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : अभिषेक- ईशानसारखे 'बकासूर', पॅट कमिन्ससारखा खवटा बॉलर; पण काव्याची एक चूक सनरायझर्सला महागात पडणार!







