advertisement

Shocking News : भयंकर! 4 वर्षांचा चिमुकल्यांना पाणी समजून थिनर प्यायलं; तोंडापासून ते पोटापर्यंत...;ठाण्यातील घटना

Last Updated:

Thane News : ठाणे शहरातून समोर आलेल्या धक्कादायक घटनेने सर्वांना हादरुन सोडले आहे, ज्यात घरातील लहान मुलांवर लक्ष न ठेवल्यास किती मोठा प्रकार घडू शकतो ते समोर आले आहे.

बालकाने चुकून थिनर पिल्याची घटना ठाणे
बालकाने चुकून थिनर पिल्याची घटना ठाणे
ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून घरात असलेले थिनर पिऊन टाकले आहे. ही थरकाप उडवणारी घटन सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडल्याने कुटुंबात घबराट पसरली.
खेळता खेळता घडला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, यादव कुटुंब हे वागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहेत. सोमवार सायंकाळी चिमुकला घरात खेळत होतो. दरम्यान त्याच वेळी घरात एका डब्यात असलेले थिनर त्याला पाणी असल्याचे वाटले आणि त्याने ते पिऊनही टाकले. अवघ्या काही मिनिटांनी त्याच्या घशाला त्रास होऊन जळजळ होऊ लागली आणि पोटातही दुखू लागल्याने त्याने लगेच जाऊन आईला माहिती दिली.
advertisement
पोराने सर्व सांगतिल्या कुटुंबियांनी कोणताही उशीर न करता लगेच जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवले. सध्याच्या स्थितीला चिमुकल्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking News : भयंकर! 4 वर्षांचा चिमुकल्यांना पाणी समजून थिनर प्यायलं; तोंडापासून ते पोटापर्यंत...;ठाण्यातील घटना
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement