Pune Crime : दहिवडीतील 12 वर्षांच्या मुलाची हत्या? पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा खळबळजनक खुलासा, वर्षभरापूर्वी असंच झालं होतं!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Pune Crime dahiwadi suspicious death : मुलाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. मात्र, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून तो बिबट्याचा हल्ला नसून हत्या असल्याचे समोर आले होते.
Pune Crime News : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात असणाऱ्या मांजरेवस्ती येथे मंगळवारी एकच खळबळ उडाली. मंगळवारी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास 12 वर्षीय मुलाचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने संपूर्ण परिसरात कल्लोळ उडाला होता. साईराज गणेश मांजरे असं मृत मुलाचं नाव आहे. सुरूवातीला बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात होता. पण साईराजची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी याविषयी माहिती दिली आहे.
प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल
शिरूर तालुक्यातील दहिवडी येथील एका 12 वर्षांच्या मुलाच्या मृत्यू प्रकरणावर धक्कादायक माहिती संदीप सिंह गिल यांनी दिली. उसाच्या शेतात या मुलाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या शरीरावरील जखमांच्या स्वरूपामुळे पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पोलीस आता सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यावेळी संबंधित मुलाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. मात्र, फॉरेन्सिक लॅबच्या अहवालातून तो बिबट्याचा हल्ला नसून हत्या असल्याचे समोर आले होते.
advertisement
वर्षभरापूर्वी असंच घडलं होतं...
धक्कादायक बाब म्हणजे याच ठिकाणी याच शेतात याच जागेवर वर्षभरापूर्वी 11 वर्षीय यश गायकवाड या मुलाचा मृतदेह अशाच अवस्थेत आढळला होता. त्यामुळेच आता पुन्हा अशाच पद्धतीने मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांमधील साम्य पाहून पोलीस आता अधिक गांभीर्याने तपास करत असून, तपासात अनेक गोष्टी स्पष्ट होतील असा विश्वास गिल यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
पोलीस प्रशासनाकडून शाळांमध्ये जनजागृती
सध्या अनेक मुले चुकीच्या मार्गाला लागत असून पोलीस प्रशासनाकडून शाळांमध्ये जनजागृती केली जात आहे. मात्र, प्रत्येक शाळेत जाऊन मुलांच्या बॅग चेक करणं पोलिसांना तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही, पण जर काही ठोस माहिती मिळाली तरच अशी कारवाई केली जाऊ शकते, असे सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.
advertisement
संगतीवर विशेष लक्ष देण्याची गरज
दरम्यान, पालक आणि शिक्षकांनी मुलांच्या वागणुकीवर आणि त्यांच्या संगतीवर विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती का वाढत आहे, यावर पालकांनी आणि शिक्षकांनी मिळून मार्ग काढणे गरजेचे आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 10:59 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : दहिवडीतील 12 वर्षांच्या मुलाची हत्या? पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचा खळबळजनक खुलासा, वर्षभरापूर्वी असंच झालं होतं!









