Western Railway Update : लोकलच्या गर्दीचं नो टेन्शन, पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, 15 डब्यांची ट्रेन 'या' दिवशी धावणार
Last Updated:
Western Railway Update : पश्चिम रेल्वेवर 15 डब्यांच्या लोकल गाड्या सुरु होण्याची तारीख समोर आलेली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून गर्दी कमी होण्यास मदत होईल.
मुंबई : पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. उद्यापासून प्रवाशांना 12 डब्याच्या लोकलमधून प्रवास करण्याची गरज नाही. यामुळे निर्णयामुळे रेल्वेगाड्यांमधील तुडुंब गर्दी कमी होण्यास मदत होणार असून दररोजच्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल.
'या' दिवशी पश्चिम रेल्वेवर धावणार 15 डबा
पश्चिम रेल्वेवर उद्यापासून (19 मार्च) 12 डब्यांच्या 16 उपनगरीय लोकल गाड्या या 15 डब्यांच्या करण्यात येणार आहेत. या चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीत तयार करण्यात आलेल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून 15 डब्याच्या लोकलची चाचणी सुरु होती पण ती आता यशस्वी झाल्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावर चालविण्यात येत आहे.
advertisement
पश्चिम रेल्वेवर 15 डब्याची लोकल सुरु केल्याने साधारण एकूण सेवांची संख्या 211 वरुन 227 होणार आहे तर वाढवण्यात येणाऱ्या 16 उपनगरीय लोकलच्या फेऱ्यांपैकी आठ फेऱ्या या गर्दीच्या वेळी चालण्यात येतील. त्यातीलच चार सकाळी आणि चार सायंकाळी लोकल फेऱ्या चालवल्या जातील अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेली आहे.
advertisement
विरार-अंधेरीनंतर कुठंपर्यंत धावणार
पश्चिम रेल्वेवरील विरार-अंधेरीनंतर आता वांद्रे स्थानकापर्यंत 15 डब्याच्या लोकल गाड्यांचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासाठी विलेपार्ले, सांताक्रूझ आणि खार रोड, वांद्रे या चार स्थानकांतील प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 10:51 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Western Railway Update : लोकलच्या गर्दीचं नो टेन्शन, पश्चिम रेल्वेचा मोठा निर्णय, 15 डब्यांची ट्रेन 'या' दिवशी धावणार









