advertisement

Sikandar Shaikh : 2 लाखांची कुस्ती 2 मिनिटात जिंकली, सिकंदरने मारलं सोलापूरचं मैदान! पाहा मॅचचा फुल Video

Last Updated:

Sikandar Shaikh Wrestling Match Achegaon Solapur : दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथे 1967 सालचे हिंदकेसरी पैलवान हजरत पटेल यांच्या स्मरणार्थ निकाली कुस्त्यांचा सामना भरवला गेला होता. यामध्ये सिकंदर शेख हरियाणाच्या मल्लासोबत कुस्ती लागली.

Sikandar Shaikh Won 2 Lakh rupees Wrestling
Sikandar Shaikh Won 2 Lakh rupees Wrestling
Sikandar Shaikh Achegaon Kusti : महाराष्ट्रातील प्रसिद्ध मल्ल आणि महाराष्ट्र केसरीची गदा उचलणाऱ्या सिकंदर शेखने पुन्हा नावाला साजेशी कामगिरी करून दाखवली आहे. सिकंदर शेख गेल्या काही वर्षात चर्चेत आहे. तरुणाईच्या गळ्यातील ताईत देखील त्याला म्हटलं जातं. अशातच आता सिकंदरने पुन्हा एक कारनामा करून दाखवलाय. सिकंदरने दोन लाखांची कुस्ती दोनच मिनिटात निकाली लावली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव येथे 1967 सालचे हिंदकेसरी पैलवान हजरत पटेल यांच्या स्मरणार्थ निकाली कुस्त्यांचा सामना भरवला गेला होता. यामध्ये सिकंदर शेख हरियाणाच्या मल्लासोबत कुस्ती लागली.

2 लाख रुपये इनामासाठी कुस्ती

मैदानातील मुख्य लढत 2 लाख रुपये इनामासाठी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आणि हरियाणाचा अजय बनवाला यांच्यात झाली. या अटीतटीच्या सामन्यात सिकंदरने आपल्या चपळाईच्या जोरावर अजयला चितपट केलं आणि मानाचं पारितोषिक आपल्या नावी केलं. सिकंदरच्या या विजयानंतर कुस्तीप्रेमींनी एकच जल्लोष केला असून, सोलापूरच्या लाल मातीत पुन्हा एकदा त्याचा दबदबा पहायला मिळाला. सिकंदरने यावेळी प्रेक्षकांच्या सपोर्टबद्दल त्यांचे आभार मानले.
advertisement

पाहा सिकंदरच्या कुस्तीचा व्हिडीओ... (3:46:11 पासून पुढे...)

खास शैलीत 'धोबीपछाड' डाव टाकला

मैदानातील दुसरे मोठं आकर्षण ठरली ती नेपाळचा देवा थापा आणि पंजाबचा जसप्रत सिंग यांच्यातील लढत. दीड लाख रुपये इनामासाठी झालेल्या या सामन्यात देवा थापाने आपल्या खास शैलीत 'धोबीपछाड' डाव टाकला अन् सामना जिंकला. या डावावर त्याने जसप्रतवर मात करत विजय मिळवला. प्रेक्षकांनी या चित्तथरारक लढतीला भरभरून दाद दिली. या कुस्ती महोत्सवात दीड लाख आणि १ लाख इनामाच्या अनेक महत्त्वाच्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या.
advertisement

रोख स्वरूपात बक्षिसे देऊन सन्मानित

दरम्यान, यामध्ये पैलवान सिकंदर मुजावर, नवीलाल दिवाने, सर्जेराव काळे, संतोष मोची, शाहरुख खान, विजय वारा, जीवन भुजबळ आणि मशीद शेख यांसारख्या दिग्गज मल्लांचा समावेश होता. या सर्व पैलवानांना रोख स्वरूपात बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sikandar Shaikh : 2 लाखांची कुस्ती 2 मिनिटात जिंकली, सिकंदरने मारलं सोलापूरचं मैदान! पाहा मॅचचा फुल Video
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement