Sikandar Shaikh :'...म्हणून मला बदनाम केलं', जेलमधून बाहेर येताच सिकंदर शेखने ठोकला शड्डू, पहिली पोस्ट व्हायरल!

Last Updated:

Sikandar Shaikh On Arms smuggling case : जेलमधून बाहेर येताच सिकंदर शेख याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यावेळी त्याने हेटर्सला जोरदार उत्तर दिलं आहे.

Sikandar Shaikh First Reaction After granted bail
Sikandar Shaikh First Reaction After granted bail
Sikandar Shaikh First Reaction : महाराष्ट्र केसरी आणि प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पैलवान सिकंदर शेख याला पंजाबमधल्या शस्त्रास्त्रं तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली होती. अशातच आता सिकंदरला जामीन मंजूर झाला आहे. सिकंदरच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील कुस्ती वर्तुळात मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. अशातच आता जेलमधून बाहेर येताच सिकंदर शेख याने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यावेळी त्याने हेटर्सला जोरदार उत्तर दिलं आहे.

नाव होतं म्हणून मला...

सिंकदर शेख याला जामीन मिळाल्यानंतर फॅन्ससाठी पैलवानाने सोशल मीडिया पोस्ट करून एका वाक्यात आपली बाजू मांडली आहे. नाम था इसलिये बदनाम कर पाये (नाव होतं म्हणून बदनाम करता आलं) असं सिकंदर शेखने फोटो शेअर करत म्हटलं आहे. सिकंदरने यावेळी #heaters असा किवर्ड देखील वापरला आहे. सिकंदरच्या या पोस्टला अनेकांनी लाईक केलंय.
advertisement
advertisement

सिकंदरचा जामीन मंजूर

पंजाबमधल्या पपला गुर्जर टोळीला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याच्या आरोपाखाली सिकंदरसह चौघांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 99 हजार रुपये रोख रक्कम, 5 पिस्तुलं, काही काडतुसे आणि स्कॉर्पिओ-एन व एक्सयूव्ही अशा दोन गाड्या जप्त केल्या होत्या. त्यानंतर चौघांपैकी सिकंदरचा जामीन मंजूर झाला होता. सिकंदर शेखच्या नावावर कोणताही गुन्हा नव्हता. आता पहिल्यांदाच असा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती.
advertisement

सुप्रिया सुळेंचा पंजाबचे मुख्यमंत्र्यांना फोन

दरम्यान, सिकंदर शेखसाठी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना फोन करून चर्चा केली होती. या प्रकरणात योग्य ती माहिती घेऊ, असं आश्वासन भगवंत मान यांनी दिलं होतं. अशातच जामीन मंजूर झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले होते. तर रोहित पवार यांनी देखील ट्विट करत सिकंदरच्या जामीनासाठी आवाज उठवला होता.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sikandar Shaikh :'...म्हणून मला बदनाम केलं', जेलमधून बाहेर येताच सिकंदर शेखने ठोकला शड्डू, पहिली पोस्ट व्हायरल!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement