Sikandar Shaikh Arrest : 'भोळ्या स्वभावाचा फायदा...', सिकंदरच्या अटकेनंतर काका पवारांची पहिली प्रतिक्रिया, 'सुशीलसोबत जे झालं....'
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Kaka Pawar On Sikandar Shaikh Arrest : आपला महाराष्ट्राचा भोळा पैलवान अडकला आहे. पंजाब आणि हरियाणा इथं दोन नंबरचा धंदा चालू असतो, असं काका पवार यांनी म्हटलं आहे.
Sikandar Shaikh Arrest : महाराष्ट्रातील प्रसिद्ध मल्ल आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. शस्त्रास्त्र तस्करीचा आरोप सिकंदरवर आहे. मात्र, सिकंदरच्या कुटुंबियांनी त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले असून त्याला कुणीतरी अडवकल्याचं म्हटलं आहे. अशातच आता महाराष्ट्रातील कुस्तीचे भीष्मपितामह मानले जाणारे काका पवार यांनी सिकंदरच्या प्रकरणावर मत मांडलं आहे. त्यावेळी त्यांनी सिकंदरचा फसवलं गेल्याचा दावा केला आहे.
सिकंदरच्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेतला - काका पवार
सिकंदर शेख हा गुणी मुलगा आहे. तो असं काही करेल वाटत नाही. माणसाला समोरचा माणूस लगेच ओळखू येतो. सिकंदरच्या भोळ्या स्वभावाचा कुणीतरी फायदा घेतला आहे. सिकंदरच्या वडिलांनी बरोबर सांगितलं की, हरियाणा पंजाबमध्ये सध्या असंच काहीतरी सुरू असतं. त्यात आपला महाराष्ट्राचा भोळा पैलवान अडकला आहे. पंजाब आणि हरियाणा इथं दोन नंबरचा धंदा चालू असतो, तिथं सिकंदरला अडकवलं, असं काका पवार म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना काका पवार यांनी आपलं मत मांडलं
advertisement
सुशीलसोबत जे झालं तेच सिकंदरसोबत - काका पवार
सिकंदरचं चरित्र चांगलं आहे. तो अशा धंद्यात पडणार नाही. ना त्याला पैशाची हौस आहे. पंजाब आणि हरियाणाच्या बाजूला पाकिस्तान असल्याने दोन नंबरचे धंदे सर्रास होतात. पण नेमकं काय झालं होतं, हे सिकंदरशी बोलल्यावर कळेल. सिकंदरचे वडील खूप गरीब आहे, त्यामुळे सिकंदरचा स्वभाव देखील शांत आहे. पंजाबमध्ये तो एका पैलवानासोबत राहत होता. सुशीलसोबत जे झालतं तसंच सिकंदरसोबत झालं असेल, असं मत काका पवार यांनी व्यक्त केलं आहे.
advertisement
सिकंदरच्या वडिलांनी काय म्हटलं?
दरम्यान, मला पोलिसांनी वा कुणीही माहिती दिली नाही. मला मोबाईलवरून कळालं की सिकंदरला अटक झालीये. सिकंदरने सगळं कष्टाने कमवलंय. सिकंदरशिवाय आमचा कुणीही आधार नाही. सिकंदरवर प्रेम करणारी लोकं लय हायेत. महाराष्ट्र सिकंदरवर प्रेम करतो. त्याच्यासारखा पैलवान पुढं कधीही होणार नाही. पण माझ्या मुलावर अन्याय करू नका. त्यानं सगळं कष्टानं कमावलेलं आहे, असं सिकंदरच्या वडिलांनी म्हटलं आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 02, 2025 8:22 AM IST
मराठी बातम्या/ बातम्या/बातम्या/
Sikandar Shaikh Arrest : 'भोळ्या स्वभावाचा फायदा...', सिकंदरच्या अटकेनंतर काका पवारांची पहिली प्रतिक्रिया, 'सुशीलसोबत जे झालं....'


