Business Ideas: फक्त 300 रुपयांना खरेदी करा अन् 500 ला विका, व्यवसायासाठी होलसेल भावात शर्ट्स, पिंपरीत हे आहे मार्केट
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. या काळात तुम्हाला कपड्याचा व्यवसाय करण्याची चांगली संधी आहे. आकुर्डी मार्केटमध्ये शर्ट्स आता होलसेल भावात उपलब्ध आहेत.
पुणे: सध्या सणासुदीचा काळ सुरू आहे. या काळात तुम्हाला कपड्याचा व्यवसाय करण्याची चांगली संधी आहे. आकुर्डी मार्केटमध्ये शर्ट्स आता होलसेल भावात उपलब्ध आहेत. 500 ते 600 रुपयांचे शर्ट आता 300 रुपयांमध्ये, तर 900 रुपयांचे शर्ट 500 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. मार्केटमध्ये फक्त शर्ट्सच नव्हे, तर टी-शर्ट्स, ट्राउझर्स, जॅकेट्स आणि इतर फॅशन वस्तूही मिळतात. तुम्ही हे शर्ट्स स्वतःसाठी खरेदी करू शकता किंवा होलसेल भावात घेऊन स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू शकता. यामुळे कमी गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची संधी आहे. याविषयीची माहिती अरबाज शेख यांनी लोकल 18 ला दिली आहे.
आकुर्डी मार्केटमध्ये शर्टवर धमाकेदार ऑफर
आकुर्डी मार्केटमध्ये शर्टवर मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट देण्यात येत आहे. अरबाज शेख यांनी सांगितले की सध्या न्यू फॅशन मार्केटमध्ये विविध प्रकारचे शर्ट होलसेल भावात उपलब्ध आहेत. 500 ते 600 रुपयांचे शर्ट आता 300 रुपयांमध्ये खरेदी करता येत आहेत, तर 900 ते 1000 रुपयांचे शर्ट आता 500 रुपयांना मिळत आहेत.
advertisement
या मार्केटमध्ये कपड्यांवर दिलेल्या सवलतीचा फायदा तुम्ही स्वतःसाठी घेऊ शकता किंवा होलसेल भावात खरेदी करून तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शर्ट आणि फॅशनचे अनेक पर्याय पाहायला मिळतात, त्यामुळे शॉपिंगसाठी किंवा व्यवसायासाठी दोन्ही दृष्टीने उपयुक्त आहे. पिंपरी चिंचवड येथील आकुर्डी मार्केटमध्ये या ऑफर चालू आहेत.
advertisement
मार्केटमध्ये फक्त शर्ट्सच नव्हे, तर टी-शर्ट्स, ट्राउझर्स, जॅकेट्स आणि इतर फॅशन आयटम्सही उपलब्ध आहेत. अनेक ब्रँड्स आणि डिझाईन्समुळे प्रत्येकाला पसंतीचे कपडे सहज मिळतात. कपड्यांवर सध्या खास सवलत देण्यात आली आहे, त्यामुळे कमी पैशात जास्त कपड्याची खरेदी करू शकता. होलसेल भावात खरेदी केल्यास तुम्ही स्वतःचा लहान व्यवसाय सुरू करू शकता. मार्केटमध्ये भेट दिल्यास तुम्हाला अनेक पर्याय दिसतील, तुम्ही कमी गुंतवणुकीतून चांगला नफा मिळवू शकता.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 18, 2026 3:24 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Business Ideas: फक्त 300 रुपयांना खरेदी करा अन् 500 ला विका, व्यवसायासाठी होलसेल भावात शर्ट्स, पिंपरीत हे आहे मार्केट





