advertisement

Pune Crime : पत्र्याचं घर तरीही 7 लाख दिले, पुन्हा जावयाची 20 लाखांची मागणी! हुंडाबळी प्रकरणात वैष्णवीच्या आईचा धक्कादायक खुलासा

Last Updated:

Pune Vaishnavi Dowry Crime News : पुण्यात विवाहितेने कौटुंबिक छळाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. वैष्णवी यशवंत लाटे असं मृत तरुणीचं नाव आहे. अशातच वैष्णवीच्या आईने धक्कादायक माहिती दिली आहे.

Pune Vaishnavi Jamkar Dowry Death Case
Pune Vaishnavi Jamkar Dowry Death Case
Pune Vaishnavi Jamkar Dowry Death Case (सुरेश जाधव, प्रतिनिधी) : ऐकीकडे पोरांची लग्न जुळत नसल्याने समाजिक परिस्थिती हाताबाहेर असताना गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील हुंडाबळी प्रकरणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. गेल्या दोन महिन्यात अनेक प्रकरण समोर येत असताना पुणे जिल्ह्यातील लोणीकंद परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील कामानिमित्त पुण्यात स्थायिक झालेल्या एका कुटुंबातील 22 वर्षीय विवाहितेने कौटुंबिक छळाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. वैष्णवी यशवंत लाटे असं मृत तरुणीचं नाव आहे. अशातच वैष्णवीच्या आईने धक्कादायक माहिती दिली आहे.

पुण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल 

लेकीने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच वैष्णवीच्या आईने थेट पोलीस स्टेशन गाठलं अन् तक्रार दाखल केली. पैशांसाठी वारंवार तगादा लावत मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा गंभीर आरोप पतीसह सासू, सासरा आणि दिर यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी वैष्णवीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावेळी वैष्णवीच्या आईने धक्कादायक माहिती दिली.
advertisement

पैशांसाठी विवाहितेचा वारंवार छळ

माझ्या मुलीला एक वर्षभरापासून सासरच्या मंडळींनी पैशांसाठी तिचा वारंवार छळ केला. सतत पैसे मागितले जात होते. आत्तापर्यंत मी सात लाख रुपये मुलीच्या सासरच्या मंडळीला नेऊन दिले. पुन्हा सासरच्या लोकांनी वीस लाख रुपयांची मागणी केली. तरी देखील मी ते पैसे देण्यासाठी स्वतःचं घर देखील विकून तयारी केली. माझ्या मुलीने टोकाचं पाऊल उचलण्याआधी मी माझ्या मुलीला पुण्यात भेटण्यासाठी गेले अन् तिच्या सासरच्या मंडळीची समजूत काढली. त्यावेळी त्यांनी पैशांचा तगदा लावला होता, असा आरोप वैष्णवीच्या आईने केला आहे.
advertisement

नेमकं काय म्हणाली वैष्णवीची आई? 

17 जानेवारीला मी कॅश घेऊन पुण्याला गेले. आम्ही मायलेकी दोघीही कॅश घेऊन गेलो होतो. जावयानं ऑनलाईन पैसे घेतले नाहीत. दोन महिन्यापूर्वी आम्ही पाच लाख दिले. त्यानंतर लगेत महिन्याभरात त्यांनी 20 लाखांची मागणी केली. आमच्या मुलीला मारहाण होत होती. तिला पाच पाच दिवस जेवायला देत नव्हते. तिच्याकडून चार महिन्यापूर्वी फोन हिसरावून घेतला होता. शुक्रवारी तिचा फोन आला. तिने पुण्याला येयला सांगितलं. आम्ही तिथं गेल्यावर सांगितलं की, आणखी 20 लाख रुपये द्या, नाहीतर हिला आम्ही मारून टाकीन.
advertisement

माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नाही - वैष्णवीची आई

दरम्यान, मला वेळ द्या मी तुम्हाला पैसे देईल, असं वैष्णवीच्या आईने लेकीच्या प्रेमापोटी विनंती केली. मात्र मी घरी परत येईपर्यंत माझ्या मुलीने आत्महत्या केली असल्याचं तिच्या सासरच्या मंडळीने सांगितलं. मात्र माझी मुलगी आत्महत्या करूच शकत नसल्याचं तिच्या आईने सांगितलं आहे. तिच्या छळ झाला असावा, अशी शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Crime : पत्र्याचं घर तरीही 7 लाख दिले, पुन्हा जावयाची 20 लाखांची मागणी! हुंडाबळी प्रकरणात वैष्णवीच्या आईचा धक्कादायक खुलासा
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement