advertisement

Skin Care : त्वचेची काळजी घेण्यासाठी आजीच्या बटव्यातला उपाय, मोहरी स्क्रबनं त्वचा दिसेल टवटवीत, नक्की वापरुन पाहा

Last Updated:

त्वचेसाठी नैसर्गिक स्क्रब आणि मॉईश्चरायझर घरातच उपलब्ध आहे. यासाठी आधीच्या पिढ्यांमधे केल्या जाणाऱ्या उपायाची आठवण. या उपायानं, त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चराइझ आणि मुलायमही. आधीच्या काळी, साबण आणि क्रीम असे कोणतेही पर्याय उपलब्ध नव्हते, तेव्हा त्वचेसाठी मोहरीचा स्क्रब वापरला जात असे.

News18
News18
मुंबई : चेहरा स्वच्छ दिसावा यासाठी एक छोटीशी आणि महत्त्वाची माहिती. ही युक्ती आपल्या घरांमधे कदाचित आधी वापरली गेली असेलही.
त्वचेसाठी नैसर्गिक स्क्रब आणि मॉईश्चरायझर घरातच उपलब्ध आहे. यासाठी आधीच्या पिढ्यांमधे केल्या जाणाऱ्या उपायाची आठवण. या उपायानं, त्वचा नैसर्गिकरित्या मॉइश्चराइझ आणि मुलायमही. आधीच्या काळी, साबण आणि क्रीम असे कोणतेही पर्याय उपलब्ध नव्हते, तेव्हा त्वचेसाठी मोहरीचा स्क्रब वापरला जात असे.
advertisement
मोहरीचा स्क्रब - मोहरीचा स्क्रब प्राचीन काळापासून वापरला जातोय. हा स्क्रब शरीरावर सुकताना मृत त्वचा काढून टाकली जाते आणि त्वचा स्वच्छ, मऊ आणि चमकदार दिसते. या स्क्रबबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.
मोहरीची पेस्ट बनवणं खूप सोपं आहे. मोहरी मंद आचेवर हलकी भाजून घ्या. नंतर, मिक्सरमधे किंवा खलबत्त्यात बारीक वाटून घ्या. या पावडरमधे थोडं मोहरीचं तेल घालून पेस्ट बनवा.
advertisement
ही पेस्ट संपूर्ण शरीरावर लावा आणि काही मिनिटे हलक्या हातानं मसाज करा. पेस्ट सुकल्यावर अंघोळ करा.
मोहरी स्क्रबचे त्वचेसाठी फायदे - मोहरीच्या दाण्यांमधे व्हिटॅमिन ई, के आणि डी असतात, ज्यामुळे त्वचा आतून मजबूत होते. मोहरी स्क्रबमुळे त्वचेवर चमक येते आणि टॅनिंग कमी व्हायला मदत होते. मोहरीच्या पेस्टमधे बॅक्टेरियाविरोधी, बुरशीविरोधी आणि दाहशामक गुणधर्म असतात. यामुळे त्वचेचं संसर्गापासून रक्षण होतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : त्वचेची काळजी घेण्यासाठी आजीच्या बटव्यातला उपाय, मोहरी स्क्रबनं त्वचा दिसेल टवटवीत, नक्की वापरुन पाहा
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement