Eknath Shinde On Uddhav Thackeray: विधान परिषद निवडणुकीत ठाकरेंना मदत करणार? एकनाथ शिंदे यांचं सूचक वक्तव्य, ''त्या निवडणुकीच्या वेळी...''
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Eknath Shinde Uddhav Thackeray : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्री दिल्ली दौऱ्यावर दाखल झाले होते. काल रात्री अचानकपणे एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आल्यानं चर्चांना उधाण आले होते.
दिल्ली: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्री दिल्ली दौऱ्यावर दाखल झाले होते. काल रात्री अचानकपणे एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आल्यानं चर्चांना उधाण आले होते. आज, सकाळी एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत मदत करणार का, यावर थेट भाष्य केले.
पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आजच्या बैठकीत राज्यातील विकास कामांच्या मुद्यावर चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटले की, युद्ध काळात सगळ्यांनी एकत्र येऊन एकजुटीने पंतप्रधानांसोबत उभे राहणं आवश्यक आहे. विरोधकांकडून राजकारण सुरू आहे. हा प्रकार निंदनीय आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नाने युद्धजन्य स्थितीमध्ये परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यात यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
ठाकरेंना मदत करणार?
राज्यातील राज्यसभा निवडणुका बिनविरोध पार पडल्या. त्यानंतर आता विधान परिषदेच्या निवडणुका पार पडणार आहेत. या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. उद्धव ठाकरे हे पुन्हा विधान परिषदेत निवडून यावे असा मतप्रवाह ठाकरे गटात सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेत मदत करणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक वक्तव्य केले. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी फोन केला तर मदत करणार का?, असं पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आताच राज्यसभेची निवडणूक झाली. विधानपरिषदेची निवडणूक येईल, तेव्हा बघू, असं हसतहसत एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 2:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde On Uddhav Thackeray: विधान परिषद निवडणुकीत ठाकरेंना मदत करणार? एकनाथ शिंदे यांचं सूचक वक्तव्य, ''त्या निवडणुकीच्या वेळी...''







