चालू नाटक थांबवून प्रेक्षकांवर भडकला आस्ताद काळे, 'सविता दामोदार परांपजे'च्या प्रयोगादरम्यान काय घडलं?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेता आस्ताद काळे यानं नाटक अर्ध्यावरच थांबवलं. तो प्रेक्षकांवर भडकला. नेमकं काय घडलं? आस्ताद काळेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
प्रसिद्ध मराठी अभिनेता आस्ताद काळे सध्या सविता दामोदर परांजपे या नाटकात काम करतोय. या नाटकाचे सध्या हाऊसफुल प्रयोग सुरू आहेत. प्रेक्षक या नाटकाला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. दरम्यान एका ठिकाणी नाटक सुरू असताना अभिनेता आस्ताद काळे यानं नाटक अर्ध्यावरच थांबवलं. तो प्रेक्षकांवर भडकला. नेमकं काय घडलं? आस्ताद काळेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
नाट्यगृहांमध्ये नाटक सुरू होण्याआधी नेहमीच मोबाईल सायलेंटवर ठेवा, फोनवर बोलू नका, लहान बाळ रडत असेल तर बाहेर जा अशा सुचना देण्यात येतात. मात्र अनेकदा सूचना देऊनही प्रेक्षक त्या पाळत नाहीत. असाच काहीसा प्रकार अभिनेता आस्ताद काळेच्या नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडला.
advertisement
सविता दामोदार परांजपे हे नाटक सुरू असताना प्रेक्षकांमध्ये कोणाच्या तरी फोनवर बोलण्याचा आवाज आला. आवाज ऐकून आस्तादने नाटक अर्ध्यावर थांबवलं. तो स्टेजच्या पुढे आला आणि त्याने फोनवर बोलणाऱ्या प्रेक्षकाला चांगलंच झापलं. आस्ताद म्हणाला, आम्ही तुमच्या बदली फोनवर येऊन बोलतो मग तुम्ही इथे येऊन आमचं नाटक करा. त्यानंतर तो त्याच्या जागेवर गेला आणि पुन्हा मागे वळला आणि त्याने हात जोडून नाटक मध्येच थांबवल्याने सगळ्यांची माफी देखील मागितली.
advertisement
advertisement
सांस्कृतिक कलादर्पणच्या व्यावसायिक नाट्य महोत्वासात सविता दामोदर परांजपे नाटकाचा प्रयोग माटुंगाच्या यशवंत नाट्य मंदिर मध्ये रंगला होता तेव्हा हा संपूर्ण प्रकार घडला. अभिनेता आस्ताद काळेचा अति संवेदनशील प्रवेश सुरू होता आणि तेवढ्यात एका प्रेक्षकाचा फोन वाजला आणि तो प्रेक्षक मोठ्याने फोनवर बोलत होता त्यावर आस्वाद काळेचा ताबा सुटला आणि त्याने प्रयोग थांबवून त्या प्रेक्षकाला चांगलंच झापलं.
advertisement
याआधी देखील अनेक कलाकारांना नाटकाच्या प्रयोगादरम्यान असे प्रकार घडल्यानंतर मध्येच थांबून प्रेक्षकांशी संवाद साधला आहे. अनेकदा प्रेक्षकांचे फोन वाजतात आणि त्यामुळे स्टेजवर असलेल्या कलाकारांना त्यांच्या कामात त्रास होतो. आस्ताद काळेच्या या कृतीचं अनेकांनी कौतुक केलं आहे. राग अनावर झालेला असतानाही संयम राखून त्याने पुन्हा प्रयोग सुरू केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 2:25 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
चालू नाटक थांबवून प्रेक्षकांवर भडकला आस्ताद काळे, 'सविता दामोदार परांपजे'च्या प्रयोगादरम्यान काय घडलं?









