'ही' आहे जगातील पहिली एयरबॅग असलेली स्कूटर! इंजिन, मायलेज सर्वच भारी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
यामाहाने जगातील पहिले एयरबॅग असलेले स्कूटर सादर केले आहे. यामुळे तुम्हाला यावर प्रवास करताना सेफ्टीचं टेन्शन नसतं. स्कूटरचं इंजिन, मायलेज किती आहे चला जाणून घेऊया.
मुंबई : एयरबॅग हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर एखादी आलिशान कार येते. कारण कारमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एयरबॅग्स दिल्या जातात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व कारमध्ये सरकारने 6 एयरबॅग अनिवार्य केल्या आहेत. पण तुम्ही कधी स्कूटरमध्ये एयरबॅग असं ऐकलंय का? यापूर्वी नसेल ऐकलं. पण आता यामाहा कंपनीने आपली एयरबॅग असलेली जगातील पहिली स्कूटर सादर केली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
पहिले Piaggio MP3 सारख्या मॉडल्समध्ये अशा आयडिया पाहिल्या होत्या. मात्र अशा प्रकारची पूर्ण तयार स्कूटर पहिल्यांदाच आली आहे. डिझाइनविषयी बोलायचं झाल्यास, 2026 मध्ये मॉडल नवं आणि जास्त शॉर्प लूक देण्यात आला आहे. यामध्ये नवीन LED लाइट्स, बदललेला फ्रंट डिझाइन आणि नवा टेल लँप देण्यात आला आहे. ज्यामुळे हे जास्त मॉडर्न आणि स्पोर्टी दिसते. यासह व्हाइट, ग्रीन आणि ग्रीसारखे नवीन कलर ऑप्शनही देण्यात आले आहेत.
advertisement
इंजिन, पॉवर आणि मायलेज : इंजिनविषयी बोलायचं झाल्यास, यामध्ये 292cc चं इंजिन देण्यात आलं आहे. जे 28 PS ची पॉवर आणि 28.9 Nm टॉर्क देते. यामध्ये ऑटोमॅटिक गियरबॉक्स मिळते आणि हे जवळपास 30.3 kmplचं मायलेज देते. इंजिनमध्ये जास्त बदल केलेला नाही. मात्र नवीन एमिशन नियमांना पूर्ण करण्यासाठी यामध्ये नवीन कॅटेलिटिक कन्व्हर्टर जोडण्यात आलं आहे.
advertisement








