advertisement

BBM 6 : घरात जेवणाची नासाडी करणं राखी सावंतला महागात! रितेशही संतापला, सीझन संपेपर्यंत भोगणार ही शिक्षा

Last Updated:
बिग बॉसच्या घरात जेलणाची नासाडी करणं राखी सावंतला महागात पडलं आहे. राखीला बिग बॉसने कडक शिक्षा दिली आहे. जी संपूर्ण सीझनमध्ये तिला भोगावी लागणार आहे.
1/7
Bigg Boss Marathi 6 मध्ये या आठवड्यात प्रचंड ड्रामा पाहायला मिळाला. यावेळी राखी सावंत सर्वाधिक चर्चेत पाहिली. राखीनं या आठवड्यात मोठी चूक केली जी तिच्या अंगाशी आली आहे. भाऊच्या धक्क्यावर राखीची चांगलीच शाळा घेण्यात आली. राखीला बिग बॉसकडून शिक्षा देखील देण्यात आली आहे. 

2/7
राखी सावतं तिच्या वागण्यामुळे आणि कृतीमुळेघरात अक्षरशः धुमाकूळ घातला, मात्र याच वागण्याचा तिला मोठा फटका बसला आहे. राखी भाजी बनवत असताना रेवा आणि दिपाली यांनी चहा बनवायला ठेवला होता. याच वेळी राखीने गुपचूप भाजीतील वांगं चहात टाकलं.

3/7
ही गोष्ट समजताच घरातील सदस्य संतापले आणि राखीशी वाद घालू लागले. परिस्थिती इतकी चिघळली की, राखीने शेवटी भाजीच फेकून दिली. अन्नाची अशी नासाडी पाहून घरातील सदस्यच प्रेक्षकही संतापले. याची शिक्षा बिग बॉसने दिली आहे. 

4/7
या सगळ्या प्रकारानंतर भाऊच्या धक्क्यावर होस्ट रितेश देशमुखनं राखीला सावंतला चांगलंच सुनावलं. रितेश म्हणाला,
या सगळ्या प्रकारानंतर भाऊच्या धक्क्यावर होस्ट रितेश देशमुखनं राखीला सावंतला चांगलंच सुनावलं. रितेश म्हणाला, "आतापर्यंत प्रेक्षक म्हणत होते लव्ह राखी, हेट राखी पण नॉट इग्नोर राखी”, मात्र आता परिस्थिती बदलली आहे. प्रेक्षक म्हणत आहेत इग्नोर राखी."
advertisement
5/7
रितेश देशमुख पुढे म्हणाले,
रितेश देशमुख पुढे म्हणाले, "बिग बॉसने ठरवलं आहे की तुम्हाला शिक्षा देऊया. राखी तुम्ही संपूर्ण सीझन कधीही कॅप्टन होऊ शकणार नाही. ज्याला अन्नाची किंमत नाही त्याला कॅप्टन बनण्याचा हक्क नाही. राखीने मला डिस्पॉइंट केलं."
advertisement
6/7
बिग बॉसने राखी सावंतला दिलेली शिक्षा ही एक दिवस किंवा आठवड्यापुरती नसून संपूर्ण सीझनसाठी आहे. या शिक्षेनुसार राखी सावंत आता बिग बॉस मराठी 6 मध्ये सीझन संपेपर्यंत कधीही कॅप्टन होऊ शकणार नाही. 

7/7
राखी सावंत नेहमीच आपल्या एंटरटेनमेंटमुळे चर्चेत असते मात्र यावेळी तिचं हे वागणं तिलाच महागात पडलं आहे. अन्नाची नासाडी ही गंभीर बाब मानली गेली असून बिग बॉसने त्यावर कडक भूमिका घेतली आहे. 

वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement