Petrol : 1 लिटर पेट्रोल मागे सरकार नक्की किती कमावते? सरकारल्या पैसे दिल्यावर डिलर काय कमावतो?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
20 मार्चपासून प्रीमियम पेट्रोलच्या दरात 2 ते 2.35 रुपयांची वाढ झाल्याच्या बातम्यांनी पुन्हा एकदा या विषयावर चर्चा सुरू केली आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की जेव्हा तुम्ही पंपावर 100 रुपये मोजता किंवा 100 रुपयांचं पेट्रोल भरता तेव्हा त्यातील नक्की किती पैसे थेट सरकारच्या खिशात जातात आणि कंपन्यांकडे काय उरते? चला पाहू गणित.
सकाळी उठल्या उठल्या लोक बातम्यांमधून दोन गोष्टी जाणून घेतात एक म्हणजे सोन्याचा दर आणि दुसरं पेट्रेल डिझेलचे दर. जरी अनेकांचा याच्याशी संबंध नसला तरी देखील बहुतांश लोक हे आवर्जून वर्तमानपत्र किंवा न्यूज चॅनलवरुन ही माहिती घेतात. कारण भले लोकांकडे गाडी नसली तरी देखील वाढलेल्या इंधनाचा खर्च हा महिन्याच्या बजेटवर नक्कीच होतो कारणयामुळे भाजीपाला महागतो. 20 मार्चपासून प्रीमियम पेट्रोलच्या दरात 2 ते 2.35 रुपयांची वाढ झाल्याच्या बातम्यांनी पुन्हा एकदा या विषयावर चर्चा सुरू केली आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की जेव्हा तुम्ही पंपावर 100 रुपये मोजता किंवा 100 रुपयांचं पेट्रोल भरता तेव्हा त्यातील नक्की किती पैसे थेट सरकारच्या खिशात जातात आणि कंपन्यांकडे काय उरते? चला पाहू गणित.
advertisement
किमतीचा सर्वात मोठा वाटा म्हणजे करतुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, तुम्ही 1 लिटर पेट्रोलसाठी जेवढे पैसे भरता, त्यातील सुमारे 40% ते 50% हिस्सा हा केवळ केंद्र आणि राज्य सरकारने लावलेल्या करांचा असतो. म्हणजेच, जर दिल्लीत पेट्रोलचा दर 94.77 रुपये असेल, तर त्यातील एक मोठी रक्कम थेट सरकारी तिजोरीत जमा होते.
advertisement
advertisement
advertisement
कंपन्या आणि डीलर्सना काय मिळते?आता प्रश्न उरतो की, तेल कंपन्या आणि पेट्रोल पंप मालक किती कमावतात?बेस प्राईस (Base Price): ऑईल मार्केटिंग कंपन्या कच्चे तेल शुद्ध करणे आणि त्याची वाहतूक करणे यावर खर्च करतात. पेट्रोलची मूळ किंमत साधारणपणे 52 ते 56 रुपये प्रति लिटर असते. कच्च्या तेलाच्या जागतिक किमतीनुसार कंपन्यांचा नफा बदलत असतो, जो सध्या प्रति लिटर 10 ते 15 रुपये असल्याचा अंदाज आहे.
advertisement
advertisement









