Sikandar Shaikh VIDEO : तिसऱ्या फेरीत सिकंदर शेखने आस्मान दाखवलं, गडचिरोलीच्या पैलवानाला 2 मिनिट 15 सेकंदात लोळवलं
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
हिंगोलीचा पैलवान आणि असंख्य कुस्ती प्रेमींच्या गळ्यातला ताईत असलेल्या सिकंदर शेखने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. सिकंदर शेखने आज गडचिरोलीच्या विक्रमसिंह भोसले याला 2 मिनिट 15 सेकंदात लोळवत 12-2 इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला होता.
Maharashtra Kesari 2026, Sikandar Shekh vs Vikrasingh Bhosale : पुणे वाघोली : रामकृष्ण अण्णा सातव पाटील आयोजित 68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अत्यंत रंजक आणि थरारक सुरु आहे. या स्पर्धेत आज हिंगोलीचा पैलवान आणि असंख्य कुस्ती प्रेमींच्या गळ्यातला ताईत असलेल्या सिकंदर शेखने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. सिकंदर शेखने आज गडचिरोलीच्या विक्रमसिंह भोसले याला 2 मिनिट 15 सेकंदात लोळवत 12-2 इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. या विजयास आता सिकंदर शेखने पुढच्या फेरीत धडक मारली होती.
खरं तर आज माती विभागाच्या तिसऱ्या फेरीत हिंगोलीचा सिकंदर शेख आणि गडचिरोलीच्या विक्रमसिंह भोसले यांच्यात लढत पार पडली होती. या लढतीत सिकंदर शेखने विक्रमसिंह भोसले याला 2 मिनिट 15 सेकंदात धुळ चारली होती. या सामन्याच्या सुरुवातीपासून सिकंदर शेख आक्रामकपणे खेळत होता.त्यानंतर सामन्याला 30 सेकंद पार पडताच सिकंदर शेखने डाव टाकला पण तो फार यशस्वी ठरला नाही.पण विक्रमसिंह सिकंदरला पछाडत दोन गुण मिळवले.
advertisement
विक्रमसिंहने पहिल्यांदा एक दोन गुण मिळवलेले पाहून सगळेच आश्चर्यचकीत झाले.त्यानंतर सिकंदर शेखने डाव टाकत एकाच झटक्यात 10 गुण मिळवले. विशेष म्हणजे मॅचच्या पहिल्याच मिनिटाला सिकंदरचे गुण 10 झाले होते.त्यामुळे जवळपास ही मॅच सिकंदर शेखने जिंकली होती.
advertisement
पण विक्रमसिंहने हार मानली नाही तो झूंज देत राहिला. जवळपास एक मिनिटं त्याने सिकंदरला गुणच घेऊ दिला. त्यानंतर पुन्हा सिकंदरने दोन गुण पटकावले आणि अशाप्रकारे त्याचे गुण12 झाले होते. आता जर कुस्तीमध्ये दोन पैलवानाच्या गुणांमधला फरक हा 10 झाला तर तांत्रिक विजय (टेक्निकल सुपेरेयारीटी) मानली जाते. त्यामुळे सिंकदर शेखला विजयी घोषीत करण्यात आले. विशेष म्हणजे ज्यावेळेस सिकंदर विजयी झाला होता त्यावेळेस फक्त 2.15 मिनिटात खेळ झाला होता.त्यामुळे सिकंदर शेखने 2 मिनिट 15 सेकंदात हा सामना जिंकला होता.
advertisement
तिसऱ्या फेरीत सिकंदर शेखने गडचिरोलीच्या विक्रमसिंह भोसले याचा 12-2 इतक्या मोठ्या फरकाने पराभव केला होता. तसेच हा सामना जिंकुन सिकंदर शेखने पुढच्या फेरीत धडक मारली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 8:42 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Sikandar Shaikh VIDEO : तिसऱ्या फेरीत सिकंदर शेखने आस्मान दाखवलं, गडचिरोलीच्या पैलवानाला 2 मिनिट 15 सेकंदात लोळवलं










