advertisement

Weather Alert: 24 तासांत वारं फिरलं, महाराष्ट्रावर पुन्हा दुहेरी संकट, हवामान विभागाकडून अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रावर अवकाळी संकट घोंघावत असून उन्हाचा पारा देखील चढला आहे. हवामान अंदाज जाणून घेऊ.
1/7
महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत. मार्चमध्ये उन्हाच्या झळांऐवजी अवकाळी पाऊस झोडपून काढत आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीटसह वादळी पाऊस होतोय. तर उष्णतेचा पारा देखील चाळीसच्या घरात आहे. 22 मार्च रोजी उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा जोर काहीसा कमी राहील. रविवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.

2/7
कोकणातील अवकाळी पावसाचं संकट टळलं आहे. मात्र आता पुन्हा उष्ण आणि दमट हवामानाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. 22 मार्चला हवामान उष्ण आणि दमट राहील. त्यानंतर मात्र तीव्रता वाढणार असून हवामान विभागाने मुंबईसह कोकणात यलो अलर्ट जारी केला आहे. रविवारी कमाल तापमान 30-34 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.

3/7
मध्य महाराष्ट्रात देखील रविवारी अवकाळी संकटाचा धोका कमी राहील. पुण्यासह सातारा आणि अहमदनगरमध्ये कोरडे हवामान राहील. तर सोलापूर, सांगली आणि कोल्हापुरात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 30-40 किमीने वारे वाहतील. तापमान 32-36 अंशांच्या दरम्यान राहील.

4/7
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह कोणत्याही जिल्ह्याला रविवारी महत्त्वाचा अलर्ट नाही. हवामान कोरडे राहील. पावसाची कोणतीही शक्यता नाही. तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस हवामानाची हिच स्थिती कायम राहील.

5/7
मराठवाड्यात रविवारी हवामान कोरडे राहील. छत्रपती संभाजीनगरसह कोणत्याही जिल्ह्याला महत्त्वाचा अलर्ट नाही. मात्र, लातूर आणि धाराशिवमध्ये विजासंह हलक्या पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 34-38 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील.

6/7
विदर्भात गेल्या काही दिवसांपासून गारपीट आणि वादळी पावसाचं धुमशान सुरू आहे. त्यामुळे नागपूरसह विविध जिल्ह्यांत शेती पिकांचं नुकसान झालं आहे. 22 मार्च रोजी हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. रविवारी हवामान कोरडे राहील. कोणताही महत्त्वाचा अलर्ट नाही. तापमान 35-38 अंशांच्या दरम्यान राहील. 24 मार्चपासून पुन्हा अवकाळी संकटाचा धोका वाढणार आहे.

7/7
एकंदरीत, महाराष्ट्रात 22 मार्च रोजी उष्णतेची लाट आणि अवकाळी पावसाचा कोणताही महत्त्वाचा अलर्ट नाही. मात्र, उन्हाचे चटके जाणवणार असून काही ठिकाणी विचांसह पावसाची शक्यता कायम आहे. 23 मार्चपासून पुन्हा वादळी पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी.

वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement