Mumbai Indians : बुमराह कमी होता, आता तो पण आला, धारदार गोलंदाजी पाहून सगळेच आवाक, सगळ्यांची झोप उडणार, VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मुंबईच्या एका खेळाडूने सरावा दरम्यान धारदार गोलंदाजी केली आहे. ही गोलंदाजी पाहून सगळेच अवाक झाले आहेत. कारण मुंबई इंडियन्सकडे जसप्रीत बुमराह कमी होता, आता तो आला आहे.
Mumbai Indians : आयपीएल 2026 चा हंगाम सूरू व्हायला आता आठवडाभराचा कालावधी उरला आहे. या दरम्यान सर्व खेळाडू आपआपल्या कॅम्पमध्ये मैदानात कसून सराव करत आहे. त्यातच मुंबईच्या एका खेळाडूने सरावा दरम्यान धारदार गोलंदाजी केली आहे. ही गोलंदाजी पाहून सगळेच अवाक झाले आहेत. कारण मुंबई इंडियन्सकडे जसप्रीत बुमराह कमी होता, आता तो आला आहे. हे पाहून सगळ्यांची झोप उडाली आहे. दरम्यान हा खेळाडू नेमका कोण आहे? आणि मुंबई इंडियन्सने त्याला किती किमतीला ताफ्यात घेतलं आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून न्यूझीलंडचा लेफ्ट आर्म फास्ट बॉलर ट्रेंट बोल्ट आहे. ट्रेंट बोल्टने 2015 साली सनरायझर्स हैदराबाद संघातून आयपीएलमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर 2016 देखील तो त्याच संघातून खेळला आणि हैदराबाद आयपीएल चॅम्पियन झाली होती.त्यानंतर तो 2017 ला कोलकत्ता नाईट रायडर्सच्या संघात गेला. 2018- 2019 ला तो दिल्ली कॅपिटल्सक़डून खेळला. 2018 मध्ये बोल्टने 18 विकेट घेतल्या होत्या.
advertisement
2020 आणि 2021 ला तो पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आला.2020 ला त्याने 15 सामन्यात 25 विकेटस घेतल्या होत्या. त्यानंतर 2022-2024 ला तो राजस्थान रॉयल्सकडून खेळला. 2025 ला त्याची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी झाली. या हंगामात त्याने 16 मॅचमध्ये त्याने 22 विकेट घेतल्या होत्या.त्याची ही कामगिरी पाहता मुंबई इंडियन्सने त्याला 2026 च्या हंगामासाठी त्याला कायम ठेवलं होतं. मुंबई इंडियन्सचा हा निर्णय फायद्याचा ठरताना दिसत आहे.कारण नेटसमध्ये ट्रेंट बोल्ट उत्कृष्ट गोलंदाजी करतो आहे.
advertisement
मुंबई इंडियन्सने ट्रेंट बोल्टचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेंट बोल्ट मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये धारदार गोलंदाजी करताना दिसला आहे.या दरम्यान त्याची ही गोलंदाजी पाहून सागळेच आवाक झाले आहे.विशेष म्हणजे ही गोलंदाजी पाहून प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरली आहे. कारण मुंबईत जसप्रीत बुमराह कमी होता आता ट्रेंट बोल्ट आला आहे. त्यामुळे या दोघांची गोलंदाजीची ताकद पाहता प्रतिस्पर्ध्यांचे काही खरं नाही.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 6:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : बुमराह कमी होता, आता तो पण आला, धारदार गोलंदाजी पाहून सगळेच आवाक, सगळ्यांची झोप उडणार, VIDEO








