उद्या चैत्र नवरात्रीचा चौथा दिवस! 'हा' रंग ठरणार शुभ, होईल आर्थिक भरभराट; नांदेल सुख-समृद्धी
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
रविवारी चैत्र नवरात्रीचा चौथा दिवस आहे. हा दिवस आदिमाया शक्तीचे चौथे रूप असलेल्या माता कुष्मांडा हिला समर्पित आहे. नवरात्रीच्या नऊ रंगांच्या मालिकेत चौथ्या दिवसाचा लकी रंग कोणता आहे जाणून घेऊयात.
advertisement
माता कुष्मांडा आणि नारंगी रंग: असे मानले जाते की माता कुष्मांडाने आपल्या मंद हास्याने ब्रह्मांडाची निर्मिती केली. तिचा तेज सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे. 'नारंगी' रंग हा सूर्याच्या तेजाशी आणि उर्जेशी संबंधित असल्याने, उद्या हा रंग परिधान केल्याने मातेची विशेष कृपा प्राप्त होते आणि व्यक्तीच्या आत्मविश्वासात वाढ होते.
advertisement
advertisement
आर्थिक भरभराट आणि समृद्धी: ज्योतिषशास्त्रानुसार, नारंगी रंगाचा संबंध गुरु आणि मंगल या दोन्ही ग्रहांच्या शुभ छटांशी येतो. उद्याच्या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरामध्ये सुख-समृद्धीचा वास होतो. व्यवसायात प्रगती हवी असेल तर उद्या हा रंग नक्की वापरावा.
advertisement
advertisement
advertisement
शुभ मुहूर्त: उद्या सकाळी 07:30 ते 10:45 ही वेळ पूजेसाठी अत्यंत उत्तम आहे. जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल, तर दुपारी 12:04 ते 12:53 या अभिजित मुहूर्तावर मातेची आराधना करून नारंगी रंगाचे वस्त्र परिधान केल्यास भाग्योदय होतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)





