advertisement

पोलिसांची रात्रीची गस्त; 24 वर्षाच्या प्रशांत रस्त्यावर दिसला उभा, जवळ जाताच मोठं कांड उघड

Last Updated:

गणेगाव रोडवरील 'संकल्प सिटी' परिसरात अमली पदार्थांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली.

तरुणाला घेतलं ताब्यात (प्रतिकात्मक फोटो)
तरुणाला घेतलं ताब्यात (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थ तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे. यात रांजणगाव एमआयडीसी परिसरात 'एमडी' (मेफेड्रोन) ड्रग्जचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि रांजणगाव पोलिसांनी संयुक्तपणे टाकलेल्या छाप्यात ३४ ग्रॅम वजनाचा आणि सुमारे ६ लाख ८० हजार रुपये किमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
अशी झाली कारवाई
सोमवारी (दि. १६) स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि रांजणगावचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांचे पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी गणेगाव रोडवरील 'संकल्प सिटी' परिसरात अमली पदार्थांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली.
advertisement
या कारवाईत प्रशांत फक्कड मावळे (वय २४, रा. रांजणगाव, मूळ रा. मलठण, ता. शिरूर) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून ३४ ग्रॅम एमडी ड्रग्जसह इलेक्ट्रिक वजन काटा आणि स्टील प्लेट असा एकूण ६ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आरोपीवर एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा अमली पदार्थ त्याने कोठून आणला आणि तो कोणाला विकणार होता, याचा अधिक तपास रांजणगाव पोलीस करत आहेत. एमआयडीसी सारख्या औद्योगिक वसाहतीत ड्रग्जचे जाळे पसरत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पोलिसांची रात्रीची गस्त; 24 वर्षाच्या प्रशांत रस्त्यावर दिसला उभा, जवळ जाताच मोठं कांड उघड
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement