advertisement

कुंडी खरेदी करायला गेले पुण्यातील 3 तरुण; दुकानदारानं पैसे कमी न केल्याचा राग, कुंडी डोक्यात घालत धक्कायक कांड

Last Updated:

मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आरोपी ऋषिकेश विठ्ठल तापकीर (वय २५, रा. वडमुखवाडी) हा त्याच्या दोन साथीदारांसह कुंडी खरेदी करण्यासाठी वामन यांच्या दुकानात आला होता

कुंडीच्या पैशावरून वाद (प्रतिकात्मक फोटो)
कुंडीच्या पैशावरून वाद (प्रतिकात्मक फोटो)
पिंपरी-चिंचवड: किरकोळ कारणावरून वाद आणि त्यातून थेट जीवघेणा हल्ला होण्याचे प्रकार शहरात वाढत चालले आहेत. चऱ्होली परिसरात कुंडी खरेदीच्या दरावरून झालेल्या वादातून एका व्यापाऱ्यावर तिघांनी मिळून भीषण हल्ला केला. या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाला असून चऱ्होली परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
राजेश चिमाजी वामन (वय ४५, रा. चऱ्होली बु.) यांचा कुंड्या विक्रीचा व्यवसाय आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास आरोपी ऋषिकेश विठ्ठल तापकीर (वय २५, रा. वडमुखवाडी) हा त्याच्या दोन साथीदारांसह कुंडी खरेदी करण्यासाठी वामन यांच्या दुकानात आला होता. कुंडीच्या किमतीवरून त्यांच्यात वाद झाला. आरोपींना कुंडी कमी दरात हवी होती, मात्र व्यापाऱ्याने नकार देताच वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
advertisement
डोक्यात कुंडीने हल्ला
संतापलेल्या आरोपींनी राजेश वामन यांना अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, दुकानातील एक जड कुंडी उचलून व्यापाऱ्याच्या डोक्यात घातली. या हल्ल्यात वामन यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
advertisement
याप्रकरणी राजेश वामन यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी ऋषिकेश तापकीर आणि त्याच्या दोन अज्ञात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्तरावर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. मात्र, किरकोळ वादातून झालेल्या या भीषण हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
कुंडी खरेदी करायला गेले पुण्यातील 3 तरुण; दुकानदारानं पैसे कमी न केल्याचा राग, कुंडी डोक्यात घालत धक्कायक कांड
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement