advertisement

आता स्मार्टवॉच नाही, स्मार्ट रिंगचा जमाना! स्लिप ट्रॅकिंग, 8 दिवसांची बॅटरी... पाडव्याला पार्टनरला गिफ्ट द्या!

Last Updated:

ऑराने अखेर भारतीय बाजारपेठेमध्ये एन्ट्री केली आहे. कंपनीने त्यांच्या लेटेस्ट स्मार्ट वेयरेबल Oura Ring 4 लॉन्च केली आहे.

आता स्मार्टवॉच नाही, स्मार्ट रिंगचा जमाना! स्लिप ट्रॅकिंग, 8 दिवसांची बॅटरी... पाडव्याला पार्टनरला गिफ्ट द्या!
आता स्मार्टवॉच नाही, स्मार्ट रिंगचा जमाना! स्लिप ट्रॅकिंग, 8 दिवसांची बॅटरी... पाडव्याला पार्टनरला गिफ्ट द्या!
मुंबई : ऑराने अखेर भारतीय बाजारपेठेमध्ये एन्ट्री केली आहे. कंपनीने त्यांच्या लेटेस्ट स्मार्ट वेयरेबल Oura Ring 4 लॉन्च केली आहे. ही स्मार्ट रिंग कॉम्पॅक्ट हेल्थ ट्रॅकर आहे, जी बोटामध्ये घालताच तुमच्या तब्येतीची माहिती तुम्हाला मिळते. ही स्मार्ट रिंग 18 मार्चपासून ऍमेझॉन आणि क्रोमावर विक्रीसाठी उपलब्ध आहे. ऑरा रिंग 4 ही स्मार्ट रिंग 50 पेक्षा जास्त हेल्थ आणि वेलनेस मॅट्रिक्स ट्रॅक करू शकते. स्लिप क्वालिटी, रिकव्हरी, डेली ऍक्टिव्हिटी आणि तुमच्या तब्येतीच्या एकूण माहिती ही स्मार्ट रिंग देते.
ऑरा 4 ची स्मार्ट रिंगची बॅटरी लाईफ 8 दिवसांची आहे, तसंच ही रिंग 100 मीटरपर्यंतच्या पाण्याचा सामना करू शकते. ही स्मार्ट रिंग 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यात सिल्व्हर, ब्लॅक, गोल्ड आणि रोज गोल्ड अशा रंगांचा समावेश आहे.

किती आहे स्मार्ट रिंगची किंमत?

ऑरा स्मार्ट रिंग 4 भारतामध्ये 28,900 रुपयांपासून मिळत आहे. तर प्रीमियम स्मार्ट रिंगची किंमत 39,900 रुपयांपर्यंत आहे. याचसोबत कंपनी 599 रुपये प्रती महिन्याचा मेंबरशीप प्लानही ऑफर करत आहे, ज्यातून यूजर्सना त्यांच्या तब्येतीची सगळी माहिती मिळेल.
advertisement

भारतीयांचा धक्कादायक स्लिप रिपोर्ट

ऑरा स्मार्ट रिंग लॉन्च करत असतानाच कंपनीने भारतीयांच्या स्लिप रिपोर्टचाही अहवाल दिला आहे. जगभरातल्या नागरिकांच्या तुलनेत भारतीय नागरिकांची झोपेची वेळ ही कमी आहे. भारतीय लोक रात्री सरासरी 6.5 तासच झोपतात, पण जागतिक गरजेनुसार प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी 7-9 तासांची झोप गरजेची आहे. या रिपोर्टनुसार भारतीयांची गाढ झोपही कमी होत आहे, ज्याचा फटका त्यांच्या मानसिक आरोग्यावर होत असल्याचा दावाही रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
advertisement

दिवसा डुलक्या घेणारे जास्त

रात्री झोपणाऱ्यांमध्ये भारतीय जगाच्या मागे असतील तरी दिवसा डुलक्या घेणाऱ्यांमध्ये भारतीय नागरिक पुढे आहेत, असं हा अहवाल सांगतो. जागतिक स्तरावर भारतीय दिवसा सरासरी 53 मिनिटांची डुलकी घेतात, जी इतर देशांच्या नागरिकांपेक्षा जास्त आहे.

सोमवारी डुलकीचं प्रमाण जास्त

अनेक भारतीय आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी डुलकी घेण्यास पसंती दर्शवतात. लांबचा प्रवास, आंतरराष्ट्रीय वेळापत्रकानुसार कामाचे तास आणि व्यस्त जीवनशैलीमुळे आठवड्याची सुरुवात पुरेशा उर्जेने करण्यासाठी दिवसभरातील छोटी विश्रांतीही महत्त्वाची असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात
advertisement
आले आहे.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
आता स्मार्टवॉच नाही, स्मार्ट रिंगचा जमाना! स्लिप ट्रॅकिंग, 8 दिवसांची बॅटरी... पाडव्याला पार्टनरला गिफ्ट द्या!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement