advertisement

नशिबाचा क्रूर खेळ! लेहच्या हिमसंकटातून सुटले, पण राजस्थानामध्ये मृत्यूनं गाठलं, पुण्याच्या 3 तरुणांसोबत धक्कादायक घडलं

Last Updated:

ज्या कारचा अपघात झाला, त्यात चौथा मित्रही होता. मात्र, मंगळवारी त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो विमानाने तातडीने घरी परतला.

अपघातात तिघांचा मृत्यू
अपघातात तिघांचा मृत्यू
पिंपरी-चिंचवड : आनंदाचा सण असलेल्या गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच पिंपरी-चिंचवड शहरातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लेह-लडाख येथे पर्यटनासाठी गेलेल्या शहरातील तीन तरुणांना रस्त्यातच मृत्यूनं गाठलं. त्यांचा राजस्थानमधील कोटा येथे दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी सकाळी ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.
कुणाल चोरडिया (२५, रा. चिंचवडगाव), मयुरेश पाडाळे (२३, रा. म्हाळुंगे) आणि सिद्धांत आल्हाट (२१, रा. थेरगाव) अशी मृतांची नावे आहेत. २७ तारखेला हे तीन तरुण फॉर्च्यूनर कारमधून उत्तर भारताच्या सहलीवर गेले होते. परतीच्या प्रवासात राजस्थानमधील केथून पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या कारला भीषण अपघात झाला.
या सहलीत एक धक्कादायक योगायोग समोर आला आहे. ज्या कारचा अपघात झाला, त्यात चौथा मित्रही होता. मात्र, मंगळवारी त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने तो विमानाने तातडीने घरी परतला. बुधवारी सकाळी आपल्या जिवलग मित्रांच्या मृत्यूची बातमी समजताच त्याला मोठा मानसिक धक्का बसला आहे.
advertisement
काही दिवसांपूर्वी हे तरुण लेह-लडाखमध्ये प्रचंड बर्फवृष्टीमुळे अडकले होते. पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांच्या मध्यस्थीने आणि BSF च्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली होती. मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडलेले हे तरुण घराच्या ओढीने परतत असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
घरी गुढी उभारण्याची तयारी सुरू असतानाच या तरुणांच्या निधनाची बातमी धडकल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
नशिबाचा क्रूर खेळ! लेहच्या हिमसंकटातून सुटले, पण राजस्थानामध्ये मृत्यूनं गाठलं, पुण्याच्या 3 तरुणांसोबत धक्कादायक घडलं
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement