Mumbai Local Megablock: प्रवाशांचे होणार 'मेगा'हाल! कुठे रात्री तर कधी दिवसा मेगाब्लॉकचा निर्णय; जाणून घ्या एका क्लिकवर
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी अर्थात 22 मार्च रोजी मध्य रेल्वेवर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. कोणकोणत्या स्थानकांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे, जाणून घेऊया...
मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या रविवारी अर्थात 22 मार्च रोजी मध्य रेल्वेवर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. हार्बर रेल्वे मार्गावर वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित (पॉवर ब्लॉक) कामांसाठी मेगाब्लॉक घेतला जाणार असून मध्य रेल्वेमार्गावर प्लॅटफॉर्मचा विस्तार करण्यासाठी जम्बोब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
advertisement
मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर, रविवारी सकाळी 11:10 ते दुपारी 04:10 या वेळेमध्य ठाणे ते वाशी/ नेरुळ दरम्यान विशेष वाहतूक आणि वीजपुरवठा खंडित (पॉवर ब्लॉक) कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत, या मार्गावरील सर्व अप आणि डाउन लोकल सेवा बंद राहणार आहे. ज्यामुळे नियमित उपनगरीय वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
याव्यतिरिक्त, प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी शनिवार मध्यरात्रीपासून रविवार सकाळपर्यंत मध्य रेल्वेचा 10 तासांचा मेगाब्लॉक नियोजित आहे. हे काम ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म 3 आणि 4 या प्लॅटफॉर्मवर तर, डोंबिवली स्टेशनवरील 1, 1 A आणि 2 या प्लॅटफॉर्मवर काम केले जाणार आहे. परिणामी, या ब्लॉकच्या कालावधीत अनेक उपनगरीय लोकल सेवा रद्द होण्याची शक्यता आहे.
advertisement
मध्य रेल्वेवरील काही प्रमुख रेल्वे स्थानकांवर दिवसागणिक प्रवाशांची गर्दी वाढत चालली आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि प्रवाशांचा धावत्या लोकलमधून जीव जाऊ नये, यासाठी 15 डब्यांची लोकल सुरु करण्याचा विचार सुरु आहे त्यामुळे लोकल थांबणे सोयीचे व्हावे यासाठी ठाणे आणि डोंबिवली स्थानकावर प्लॅटफॉर्म विस्ताराचे काम करण्यात येत आहे.
advertisement
advertisement









