advertisement

Husband Wife Age Gap : नवरा-बायकोमध्ये परफेक्ट Age गॅप किती पाहिजे आणि का? विज्ञान काय सांगतं, वाचा

Last Updated:
Ideal age gap between husband and wife : आपल्याकडे आजही ही एक अलिखित परंपरा आहे की, पतीने पत्नीपेक्षा वयाने मोठे असावे. पण 21 व्या शतकात जिथे प्रेमाला वयाचे बंधन नसते, तिथे हा प्रश्न आजही इतका महत्त्वाचा का ठरतो? चला, आज यामागचे सामाजिक आणि वैज्ञानिक पदर उलगडून पाहूया.
1/8
 "लगीनघाई" सुरू झाली की घराघरात पाहुण्यांची ये-जा वाढते. मुलगा काय करतो? मुलगी किती शिकली आहे? इथपासून ते पत्रिका मिळेपर्यंत अनेक चर्चा रंगतात. पण या सगळ्यात एक प्रश्न अगदी हमखास विचारला जातो, तो म्हणजे "मुलाचे वय काय आणि मुलगी त्याच्यापेक्षा किती लहान आहे?" आपल्याकडे आजही ही एक अलिखित परंपरा आहे की, पतीने पत्नीपेक्षा वयाने मोठे असावे. पण 21 व्या शतकात जिथे प्रेमाला वयाचे बंधन नसते, तिथे हा प्रश्न आजही इतका महत्त्वाचा का ठरतो? चला, आज यामागचे सामाजिक आणि वैज्ञानिक पदर उलगडून पाहूया.

2/8
भारतीय समाजात वर्षानुवर्षे पती-पत्नीमध्ये 3 ते 5 वर्षांचे अंतर असणे आदर्श मानले जाते. अरेंज मॅरेजमध्ये तर या अटीला विशेष महत्त्व असते. मात्र, सध्याच्या डेटिंग आणि लव्ह मॅरेजच्या जमान्यात ही समीकरणे बदलताना दिसत आहेत. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडतात, तेव्हा वय हा केवळ एक आकडा उरतो. तरीही, संसाराचा गाडा हाकताना हे वयाचे अंतर नक्की किती असावे, यावर चर्चा होताना दिसते.

3/8
काय सांगते विज्ञान?तुम्हाला वाटत असेल की वयातील अंतराचा हा नियम फक्त समाजाने बनवला आहे, तर तसे नाही. विज्ञानाच्या मते, मुले आणि मुलींच्या शारीरिक आणि मानसिक परिपक्वतेचा (Maturity) वेग वेगवेगळा असतो.

4/8
मुलींमध्ये साधारणपणे 7 ते 13 वर्षांच्या दरम्यान हार्मोनल बदल सुरू होतात, तर मुलांमध्ये हा काळ 9 ते 15 वर्षांचा असतो. यामुळे मुली मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मुलांच्या तुलनेत लवकर परिपक्व होतात.भारतात मुलींसाठी लग्नाचे कायदेशीर वय 18 आणि मुलांसाठी 21 वर्षे आहे. येथेही शासनाने 3 वर्षांचे अंतर ग्राह्य धरले आहे, जेणेकरून दोघांमधील परिपक्वतेचा स्तर समान राहील.

5/8
चाणक्य नीती आणि वयाचे गणितप्राचीन भारतीय विचारवंत आचार्य चाणक्य यांनीही वैवाहिक जीवनात वयाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. त्यांच्या मते, पती-पत्नीमधील वयाचे अंतर खूप जास्त नसावे. जोडीदाराला केवळ मानसिकच नाही, तर शारीरिक सुख देणेही तितकेच महत्त्वाचे असते. जर वयातील अंतर खूप जास्त असेल, तर विचारांची देवाणघेवाण आणि शारीरिक गरजांमध्ये असंतुलन निर्माण होऊन नात्यात दुरावा येऊ शकतो.

6/8
बॉलिवूडची 'आऊट ऑफ द बॉक्स' उदाहरणेआजची पिढी या जुन्या नियमांना छेद देताना दिसतेय. बॉलिवूडमधील काही जोड्यांकडे पाहिल्यास लक्षात येते की, समजूतदारपणा असेल तर वय आड येत नाही: शाहिद कपूर - मीरा राजपूत: यांच्यात 15 वर्षांचे अंतर असूनही त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी आहे. रणबीर कपूर - आलिया भट्ट: यांच्यात 11 वर्षांचे अंतर आहे. प्रियांका चोप्रा - निक जोनास: इथे तर प्रियांका तिच्या पतीपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे, तरीही त्यांचे नाते जागतिक स्तरावर चर्चेत असते.
बॉलिवूडची 'आऊट ऑफ द बॉक्स' उदाहरणेआजची पिढी या जुन्या नियमांना छेद देताना दिसतेय. बॉलिवूडमधील काही जोड्यांकडे पाहिल्यास लक्षात येते की, समजूतदारपणा असेल तर वय आड येत नाही:शाहिद कपूर - मीरा राजपूत: यांच्यात 15 वर्षांचे अंतर असूनही त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी आहे.रणबीर कपूर - आलिया भट्ट: यांच्यात 11 वर्षांचे अंतर आहे.प्रियांका चोप्रा - निक जोनास: इथे तर प्रियांका तिच्या पतीपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे, तरीही त्यांचे नाते जागतिक स्तरावर चर्चेत असते.
advertisement
7/8
सुखी वैवाहिक जीवनाचे खरे सूत्रलेखाच्या शेवटी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, वयाचे अंतर 3 वर्षे असो वा 15वर्षे, लग्नाचे यश हे केवळ 'बर्थ सर्टिफिकेट'वर अवलंबून नसते. तर नात्यात एकमेकांच्या मतांचा सन्मान करणे. कठीण काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे. संकटकाळी चिडचिड न करता समजूतदारपणे मार्ग काढणे. हे सगळं सुखी वैवाहिक जीवनाचे खरे सूत्र आहे.
सुखी वैवाहिक जीवनाचे खरे सूत्रलेखाच्या शेवटी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, वयाचे अंतर 3 वर्षे असो वा 15वर्षे, लग्नाचे यश हे केवळ 'बर्थ सर्टिफिकेट'वर अवलंबून नसते.तर नात्यात एकमेकांच्या मतांचा सन्मान करणे. कठीण काळात एकमेकांच्या पाठीशी उभे राहणे. संकटकाळी चिडचिड न करता समजूतदारपणे मार्ग काढणे. हे सगळं सुखी वैवाहिक जीवनाचे खरे सूत्र आहे.
advertisement
8/8
आयुष्याचा जोडीदार निवडताना वय नक्कीच विचारात घ्यावे, पण त्यापेक्षाही समोरच्या व्यक्तीची मॅच्युरिटी आणि तुमच्याशी जुळणारे विचार जास्त महत्त्वाचे आहेत. शेवटी, संसार हा दोन शरीरांचा नाही, तर दोन मनांचा मेळ असतो.

वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement