advertisement

मराठीतील हिट फ्रँचायझी, बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या 'झिम्मा'चा तिसरा पार्ट, रिलीज डेट समोर

Last Updated:

Jhimma 3 Release Date : झिम्मा आणि झिम्मा 2 नंतर हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा 3 ची घोषणा करण्यात आली. हेमंत ढोमेनं त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी सिनेमाची रिलीज डेट घोषित केली.

News18
News18
मराठीतही एका सिनेमाचे 2-3 पार्ट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यातील एक हिट फ्रेंचायझी म्हणजे झिम्मा. हेमंत ढोमे दिग्दर्शित या सिनेमानं बॉक्स ऑफिस गाजवलं. या सिनेमाच्या तिसऱ्या पार्टची काही दिवसांआधीच घोषणा करण्यात आली होती. हा सिनेमा कधी रिलीज होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या वाढदिवसाच्या दिवशी झिम्मा 3 ची रिलीज डेट घोषित करण्यात आली आहे.
झिम्मा सिनेमानं 15 कोटींची कमाई केली होती. कोरोना लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये काही मोजक्या सिनेमांपैकी हा एक सिनेमा होता. ज्याला प्रेक्षकांची डोक्यावर घेतलं. झिम्मा 2 ने 14 कोटींची कमाई केली. आता झिम्मा 3 या दोन्ही सिनेमांचे रेकॉर्ड मोडणार का हे पाहणंही उत्सुकतेचं आहे.
advertisement
काही दिवसांपूर्वीच ‘क्रांतीज्योती विद्यालय - मराठी माध्यम’च्या जल्लोषमय सोहळ्यात या चित्रपटाची घोषणा झाली होती आणि आता पोस्टरमुळे उत्सुकता आणखीच वाढली आहे. पोस्टर पाहिल्यावर एक गोष्ट लगेच लक्षात येते, यावेळी काहीतरी वेगळं घडणार आहे! समुद्रकिनाऱ्यावर उभा असलेला सिद्धार्थ चांदेकर, त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ, आजूबाजूला भरपूर बॅग्स, सुटकेसेस, क्रिकेट बॅट आणि सूर्यफूल… त्यामुळे ही सहल आहे की काहीतरी अनपेक्षित ट्विस्ट? आणि यावेळी ‘तिसराच आहे!’ या ओळीत नेमकं काय लपलंय? असे प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले आहेत.
advertisement
पहिल्या दोन भागांमध्ये मैत्रिणींचा ग्रुप प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. आता तिसऱ्या भागात त्या पुन्हा एकत्र येणार का, की या वेळी काही नवे चेहरे, नवी नाती या ग्रुपमध्ये सामील होणार? हे पाहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
चलचित्र मंडळी प्रस्तुत 'झिम्मा 3' चं दिग्दर्शन हेमंत ढोमेचं असणार आहे. तर निर्मिती क्षिती जोगची आहे.  क्रांतिज्योती विद्यालय नंतर परत एकदा नव्या वर्षाची धमाकेदार सुरुवात करत चलचित्र मंडळी 'झिम्मा 3' हा सिनेमा 1 जानेवारी 2027 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
मराठीतील हिट फ्रँचायझी, बॉक्स ऑफिस गाजवणाऱ्या 'झिम्मा'चा तिसरा पार्ट, रिलीज डेट समोर
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement