advertisement

एक कोटी द्या, नाहीतर...खंडणीखोर लेडीचा बीडमध्ये धुमाकूळ; ठेकेदाराला ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा 'गेम' उलटला

Last Updated:

अर्जांची पोच पावती व्हॉट्सॲपवर पाठवून कंपनीची आणि पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्याची धमकी देण्यात आली होती.

News18
News18
बीड : बीडच्या यश कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात शासकीय कार्यालयात खोट्या तक्रारी दाखल करून त्या मागे घेण्यासाठी 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आळा आहे.   रेखा उत्तम वंजारे यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंपनीचे सहकंत्राटदार चांगदेव शेप यांना ही खंडणी मागण्यात आली आहे. या प्रकरणाने बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी महिला भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीची तालुका संघटक असल्याचे समोर आले.रेखा वंजारे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील आयकर विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय बीड आणि कोकण भवन येथील महामार्ग विभागाकडे तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारी अर्जांची पोच पावती व्हॉट्सॲपवर पाठवून कंपनीची आणि पदाधिकाऱ्यांची बदनामी करण्याची धमकी देण्यात आली होती.
advertisement

तक्रारी मागे घेण्यासाठी त्यांनी 1 कोटी रुपयांची रोख मागणी

रेखा वंजारे यांनी कंपनीचे सहठेकेदार  चांगदेव शेप यांच्याशी प्रत्यक्ष भेटून आणि फोनवरून संपर्क साधला. या सर्व तक्रारी मागे घेण्यासाठी त्यांनी 1 कोटी रुपयांची रोख मागणी केली. या मागणीसाठी त्यांनी वारंवार फोन करून आणि व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून दबाव निर्माण केला होता. या संपूर्ण संभाषणाचे आणि खंडणीच्या मागणीचे पुरावे म्हणून ऑडिओ रेकॉर्डिंग्स पोलिसांना सादर करण्यात आले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत अंबाजोगाई शहर पोलिसांनी रेखा वंजारे यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 308 (2) अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे करत आहेत.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एक कोटी द्या, नाहीतर...खंडणीखोर लेडीचा बीडमध्ये धुमाकूळ; ठेकेदाराला ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेचा 'गेम' उलटला
Next Article
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त, जाणून घ्या नवे दर
वेट लॉस, डायबिटीजचे 16 हजारांचे औषध आता 2 हजारात; जगातील सर्वात प्रसिद्ध औषध भारतात स्वस्त
  • लठ्ठपणा आणि मधुमेहावर आता स्वस्त उपचार

  • किमतीत ६० टक्क्यांपर्यंत मोठी घट होणार

  • जाणून घ्या किती स्वस्त मिळणार औषध

View All
advertisement