Pudina : उन्हाळ्यात पुदीना का खावा? फक्त थंडावा नाही, मिळतात जबरदस्त फायदे, एकदा हे वाचाच
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पुदीन्याचा तो विशिष्ट सुवास घेतला की लगेच फ्रेश वाटतं. ते प्यायल्यानंतर तर जिभेला एक वेगळीच चव मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का? आपण फक्त चटणी किंवा रायत्यापुरता मर्यादित असलेला हा पुदीना आयुर्वेदात एक अमोघ औषध मानला जातो.
मार्च महिना संपता संपता सूर्याचा कडाका वाढू लागला आहे. बाहेर पडलं की अंगाची लाहीलाही होते आणि मन आपोआपच थंड, ताजेतवाने पदार्थ शोधू लागतं. बाजारात रसाळ फळं तर भरपूर दिसतात, पण या सगळ्यात सर्वात जास्त रिफ्रेशिंग पदार्थ आहे तो म्हणजे पुदीना. पुदीन्याचा तो विशिष्ट सुवास घेतला की लगेच फ्रेश वाटतं. ते प्यायल्यानंतर तर जिभेला एक वेगळीच चव मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का? आपण फक्त चटणी किंवा रायत्यापुरता मर्यादित असलेला हा पुदीना आयुर्वेदात एक अमोघ औषध मानला जातो.
advertisement
advertisement
पोटाच्या समस्यांवर रामबाण उपायउन्हाळ्यात जड किंवा तेलकट खाल्ल्यामुळे अनेकांना गॅस, करपट ढेकर, पोटात जळजळ Acidity किंवा जडपणा जाणवतो. अशा वेळी पुदीना एकदम रामबाण आहे. हे खाल्याने पाचनशक्ती सुधारते. पुदीना पोटातील उष्णता कमी करून पचनसंस्था शांत करतो. तसेच ज्यांना 'इरिटेबल बाउल सिंड्रोम'चा त्रास आहे, त्यांच्यासाठी पुदीना अत्यंत फायदेशीर आहे. रोजच्या आहारात चटणी किंवा ताकाच्या माध्यमातून याचा समावेश केल्यास पोटाला आराम मिळतो.
advertisement
डोकेदुखी आणि उन्हाचा तडाखाअति उष्णतेमुळे अनेकदा डोकेदुखी, चक्कर येणे किंवा अस्वस्थता जाणवते. पुदीन्यामध्ये 'मेन्थॉल' नावाचा घटक असतो, जो मेंदूला थंडाव्याचा आभास करून देतो. जर तुम्हाला उन्हामुळे डोकेदुखी होत असेल, तर पुदीन्याचा चहा किंवा पुदीन्याचे पाणी प्यायल्याने त्वरित आराम मिळतो. उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी पुदीन्याचा रस किंवा पन्हं पिणे खूप फायदेशीर ठरते.
advertisement
त्वचेसाठी 'ब्युटी पार्लर' घरीचपुदीना फक्त खाण्यासाठीच नाही, तर स्कीनला लावण्यासाठीकही तितकाच गुणकारी आहे.जर उन्हामुळे चेहऱ्यावर वारंवार पुरळ किंवा पिंपल्स येत असतील, तर पुदीन्याचा लेप लावल्याने त्वचा शांत होते.कडक उन्हामुळे झालेली टॅनिंग घालवण्यासाठी आणि त्वचा स्वच्छ दिसण्यासाठी पुदीन्याचा वापर फेसपॅक म्हणून करता येतो.
advertisement
advertisement







