पार्किंगवरून वाद झाला अन् थेट खून केला, धारावीत जीवलग मित्रानेच मित्राला संपवलं
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Mumbai News: दोघांनाही नशेचे व्यसन होते. नशेत असतानाच दोघांमध्ये वाद झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी आशिक खान (वय २२) याला अटक केली असून त्याला २३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अश्विनी नाडर असे मृत व्यक्तीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, १६ मार्च रोजी आशिक खान आणि अश्विनी नाडर यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता. हा वाद हळूहळू वाढत गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या मारहाणीत अश्विनी गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर जखमी अवस्थेत अश्विनी नाडर याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दोघांनाही नशेचे व्यसन होते. नशेत असतानाच दोघांमध्ये वाद झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. वादाचे नेमके कारण काय होते, याचा शोध पोलीस घेत आहेत.
advertisement
या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी आशिक खान याला अटक केली. न्यायालयाने त्याला २३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनेमागचे नेमके कारण, पूर्वीचे संबंध आणि वादाची पार्श्वभूमी याबाबत पोलीस अधिक माहिती गोळा करीत आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 10:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पार्किंगवरून वाद झाला अन् थेट खून केला, धारावीत जीवलग मित्रानेच मित्राला संपवलं








