Vasai: 4 वर्षांची चिमुरडी घरासमोर खेळत होती, पाण्याच्या टँकरने चिरडलं, वसईतील हृदयद्रावक घटना
- Reported by:Vijay Desai
- Published by:Sachin S
Last Updated:
निक्षा शर्मा ही चिमुरडी आपल्या मित्रांसोबत खेळत होती. अचानक पाणी वाहून नेणारा पिकअप टँकर भरधाव वेगात आला आणि निक्षाला धडक दिली. धडक बसल्यामुळे
वसई : मुंबईजवळील वसईमधून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पाणी वाहून नेणाऱ्या टँकरखाली सापडून एका ४ वर्षांच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वसईमधील खेरपाडा परिसरातील दुर्गानगर इथं शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. निक्षा वर्मा असं मृत्यू झालेल्या ४ वर्षांच्या चिमुरडीचं नाव आहे. वसई विरार परिसरात नेहमी पाण्याची टंचाई असते. या भागामध्ये पिकअप व्हॅनमधून पाण्याचा पुरवठा केला जात असतो.
दुर्गा नगर परिसरात सायंकाळी चारच्या सुमारास निक्षा शर्मा ही चिमुरडी आपल्या मित्रांसोबत खेळत होती. अचानक पाणी वाहून नेणारा पिकअप टँकर भरधाव वेगात आला आणि निक्षाला धडक दिली. धडक बसल्यामुळे चार वर्षांची चिमुरडी ही चाकाखाली सापडली. स्थानिकांनी आरडाओरडा करून टँकरचालकाला थांबवलं. चिमुरड्या निक्षाला टँकरखालून बाहेर काढलं आणि तातडीने रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी चिमुरडीला तपासून मृत घोषित केलं.
advertisement
या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच वालीव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. चालकावर गुन्हा दाखल करून कडक शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. या भागामध्ये पाण्याची तीव्र टंचाई असते. उन्हाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे खासगी टँकर माफियांची या भागामध्ये बेदकारपणे वाहतूक सुरू असते. या टँकर माफियांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वालीव पोलीस करत आहे.
Location :
Vasai-Virar City,Thane,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 10:03 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Vasai: 4 वर्षांची चिमुरडी घरासमोर खेळत होती, पाण्याच्या टँकरने चिरडलं, वसईतील हृदयद्रावक घटना









