advertisement

प्रेमविवाह केल्याने तरुणाला विवस्त्र करून मारहाण; गावातून धिंड काढली, हातही मोडला, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!

Last Updated:

जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. इथं प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका २५ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करत त्याची नग्न धिंड काढली आहे.

jalgaon news
jalgaon news
जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. इथं प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका २५ वर्षीय तरुणाला बेदम मारहाण करत त्याची नग्न धिंड काढली आहे. केवळ मारहाण करून न थांबता संशयितांनी तरुणाचा गळा आवळून त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या पत्नीला जबरदस्तीने पळवून नेले. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ५ जणांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्याच्या खडका येथील चेतन दिलीप जंगले (वय २५) या तरुणाने त्याच्याच समाजातील १८ वर्षीय तरुणीशी प्रेमविवाह केला होता. चेतनचा हा दुसरा विवाह होता. पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्यानंतर त्याने हा विवाह केला होा. मात्र, या विवाहानंतर मुलीचे नातेवाईक प्रचंड संतप्त होते. शुक्रवारी (२० मार्च) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास चेतन आपल्या पत्नीसह मामा संतोष महाजन यांच्या घरी थांबला होता.
advertisement
यावेळी मुलीचे काका मनोज पाटील, मावशी रुपाली ऊर्फ पूनम पाटील, तेजस पाटील, कोमल पाटील आणि इतर १० ते १२ जण त्या ठिकाणी आले. त्यांनी आधी चेतनच्या मामांना धमकावले आणि त्यानंतर चेतन व त्याच्या पत्नीला मारहाण सुरू केली. संशयितांनी रुमालाने चेतनचा गळा आवळून त्याला संपवण्याचा प्रयत्न केला.

अंगावरचे कपडे फाडून नग्न धिंड काढली

advertisement
जीवाच्या भीतीने पळणाऱ्या चेतनला पकडून एका दूध डेअरीजवळ नेण्यात आले. तिथे त्याचे कपडे फाडून त्याला नग्न करण्यात आले आणि बेदम मारहाण करण्यात आली. "तुमच्या मुलीला सोडून देतो," असं त्याच्याकडून जबरदस्तीने वदवून घेतलं. आरोपी इतक्यावरच थांबले नाहीत, त्यांनी संशयिताला दुचाकीवर बसवून खडका गावातील बसस्थानकावर नेले. तिथून त्याच्या घरापर्यंत त्याची नग्न धिंड काढण्यात आली. चेतनच्या आई-वडिलांना आणि मेहुण्यालाही शिवीगाळ करत "तुमचे घर जाळून टाकू" अशी धमकी देण्यात आली. परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, मात्र स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी केल्याने चेतनची सुटका झाली.
advertisement

मारहाणीत तरुणाचा मोडला हात

या भीषण मारहाणीत चेतनचा हात मोडला असून त्याच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपास चक्र फिरवली आहेत. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये १० ते १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
प्रेमविवाह केल्याने तरुणाला विवस्त्र करून मारहाण; गावातून धिंड काढली, हातही मोडला, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement