पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीत आज मोठे बदल; 'हे' रस्ते बंद, रविवारी घराबाहेर पडण्याआधी तपासा पर्यायी मार्ग
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मोशी येथील बोऱ्हाडेवाडी परिसरात आज, रविवारी (२२ मार्च) 'विराट हिंदू संमेलन'आयोजित करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत
पिंपरी-चिंचवड: मोशी येथील बोऱ्हाडेवाडी परिसरात आज, रविवारी (२२ मार्च) 'विराट हिंदू संमेलन'आयोजित करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. या कार्यक्रमाला होणारी संभाव्य गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाने सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत काही प्रमुख मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
वाहतुकीत नेमके काय बदल आहेत?
हा भव्य कार्यक्रम रामा ग्रुप चौक आणि युटोपिया सोसायटी शेजारील शिवरस्ता परिसरात पार पडणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस उपायुक्त (वाहतूक) विवेक पाटील यांनी चिखली वाहतूक विभागांतर्गत काही बदल सुचवले आहेत.
पूर्णपणे बंद मार्ग: प्रदीप स्वीट कॉर्नर ते सिल्वर गार्डेनिया सोसायटी दरम्यानची वाहतूक सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे बंद राहील.
advertisement
प्रवेशबंदी: माऊली भेळकडून सिल्वर गार्डेनिया मार्गे शिवरस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग: वाहनचालकांनी सीएनजी पंप, लक्ष्मी चौक, कुमार प्रथम सोसायटी, क्राऊन पॉईंट हॉटेल आणि कुमार लाइफस्पेस सोसायटी या मार्गांचा वापर करावा.
प्रशासनाचे आवाहन
या संमेलनासाठी हजारो नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. अग्निशमन दल, रुग्णवाहिका यांसारख्या आपत्कालीन सेवांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी आणि पोलिसांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा अवलंब करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेमार्फत करण्यात आले आहे. परिस्थितीनुसार हे बदल रात्री उशिरापर्यंत कायम राहू शकतात, याची वाहनचालकांनी नोंद घ्यावी.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 6:50 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पिंपरी-चिंचवडमधील वाहतुकीत आज मोठे बदल; 'हे' रस्ते बंद, रविवारी घराबाहेर पडण्याआधी तपासा पर्यायी मार्ग







