advertisement

VIDEO : टीम इंडियाचा 'लाला' चमकला, IPL आधीच गोलंदाजांना फोडून काढलं, 223 च्या स्ट्राईक रेटने धावा

Last Updated:

टीम इंडियाच्या लालाने मैदानात वादळी खेळी केली आहे. या खेळी दरम्यान त्याने गोलंदाजांना फोडून काढत 223 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. या खेळीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

abhishek sharma
abhishek sharma
IPL 2026 : आयपीएल 2026 च्या हंगामाला येत्या 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरूवात होणार आहे. त्यामुळे आता जवळपास सगळ्याच खेळाडूंकडे तयारीसाठी आठवडाभराचा कालावधी उरला आहे. त्यामुळे खेळाडू मैदानात प्रचंड घाम गाळतायत. त्यात आता टीम इंडियाच्या लालाने मैदानात वादळी खेळी केली आहे. या खेळी दरम्यान त्याने गोलंदाजांना फोडून काढत 223 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. या खेळीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
टीम इंडियाला लाला म्हटलं तर तुम्हाला प्रश्न पडला असेल हा खेळाडू आहे तरी कोण, तर हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून टीम इंडियाचा स्टार फलंदाज अभिषेक शर्मा आहे.अभिषेक शर्मा हा टी20 वर्ल्ड कपमध्ये त्याला साजेशी अशी कामगिरी करू शकला नव्हता, त्यामुळे टीम इंडिया अडचणीत सापडली होती.पण मोक्याच्या क्षणी संजू सॅमसनची बॅट तळपल्यामुळे टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप जिंकला होता.
advertisement
दरम्यान आता वर्ल्ड कप समाप्तीनंतर अभिषेक शर्मा हा आपल्या सनरायझर्स हैदराबाद संघाच्या कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. या दरम्यान त्याने मैदानात कसून सराव केला होता. या सरावानंतर आता सनरायझर्स हैदराबादने एक प्रॅक्टीस मॅच खेळवला होता. या सामन्यात अभिषेक शर्माने 42 बॉलमध्ये 94 धावांची वादळी खेळी केली होती. त्याची ही खेळी पाहता तो फॉर्ममध्ये परतल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनला दिलासा मिळाला आहे.
advertisement
advertisement
टी20 वर्ल्डकपमध्ये हाच अभिषेक शर्मा आऊट ऑफ फॉर्म होता. ग्रुप स्टेज आणि सुरुवातीच्या नॉकआऊटमध्ये त्यांनी अनेकदा डक केले होते. फाइनलपर्यंत (7 इनिंग्जमध्ये) त्यांनी फक्त 89 रन केले होते. पण फाइनल मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने जबरदस्त कमबॅक केले. त्याने 21 चेंडूत 52 रन केले होते. या दरम्यान 6 चौकार, 3 षटकार लगावले होते. विशेष म्हणजे त्याने अर्धशतक फक्त 18 चेंडूत पूर्ण केले होते. हे टी20 वर्ल्ड कपमधले फायनलमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले होते.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : टीम इंडियाचा 'लाला' चमकला, IPL आधीच गोलंदाजांना फोडून काढलं, 223 च्या स्ट्राईक रेटने धावा
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement