Maharashtra Kesari : गतविजेत्या पृथ्वीराज मोहोळला 34 सेकंदात आस्मान दाखवलं, सोलापूरच्या पठ्ठ्याने मैदान गाजवलं,VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
मॅट विभागातील सेमी फायनल सामन्यात धक्कादायक निकाल लागला आहे. मागच्या वर्षी 2025 मध्ये महाराष्ट्र केसरी किताब जिंकणाऱ्या पृथ्वीराज मोहोळच सेमी फायनलमध्ये आव्हान संपुष्ठात आलं आहे.
Maharashtra Kesari 2026, Prithiviraj Mohol vs Jay Patil Semi Final : रामकृष्ण अण्णा सातव पाटील आयोजित 68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत मॅट विभागातील सेमी फायनल सामन्यात धक्कादायक निकाल लागला आहे. मागच्या वर्षी 2025 मध्ये महाराष्ट्र केसरी किताब जिंकणाऱ्या पृथ्वीराज मोहोळच सेमी फायनलमध्ये आव्हान संपुष्ठात आलं आहे.विशेष म्हणजे सोलापूरच्या जय पाटीलने त्याला अवघ्या 36 सेकंदात आस्मान दाखवलं आहे. या विजयासह जय पाटील फायनलला पोहोचला आहे.
खरं तर पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ याने मागच्या वर्षी 2025 मध्ये सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला होता. हा किताब जिंकल्यनंतर आता महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत ही तो किताब पटकवेल असे वाटत होते.पण त्याचा सेमी फायनलमध्ये पराभव झाला आहे. विशेष म्हणजे तो गादी विभागात म्हणजेच मॅटवर एक प्रमुख मल्ल म्हणून ओळखला जातो पण आज त्याचा पराभव झाला.
advertisement
सेमी फायनलमध्ये पृथ्वीराज मोहोळ समोर सोलापूरच्या जय पाटीलच आव्हान होतं. सामन्याच्या सुरूवातीला दोन्ही पैलवानांनी आक्रामक सुरूवात केली होती. त्यामुळे अटीतटीची लढत होईल असे वाटत होते. पण जय पाटीलने एकच डाव टाकला आणि सामना जिंकला होता.या दरम्यान त्याला 4 गुण मिळाले होते. विशेष म्हणजे फक्त गत विजेत्या पृथ्वीराज मोहोळला जय पाटीलने अवघ्या 34 सेकंदात चितपट केलं होतं. त्यामुळे गत विजेता महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ हा पराभूत झाल्याने महाराष्ट्र केसरीमध्ये धक्कादायक निकाल लागला होता. तसेच जय पाटीलने हा सामना जिंकून मॅट विभागात फायनल गाठली आहे.
advertisement
फायनलमध्ये कोणाशी भिडणार?
दरम्यान मॅट विभागातील दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलचा 6-2 ने पराभव केला होता. त्यामुळे हा सामना जिंकून हर्षवर्धन सदगीर फायनलला पोहोचला होता. आता फायनलला सोलापूरच्या जय पाटील आणि नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर यांच्यात लढत होणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 10:55 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Maharashtra Kesari : गतविजेत्या पृथ्वीराज मोहोळला 34 सेकंदात आस्मान दाखवलं, सोलापूरच्या पठ्ठ्याने मैदान गाजवलं,VIDEO










