Mumbai Pune expressway: मुंबईहून पुण्याला आता 30 मिनिटांआधी पोहोचा!, 'मिसिंग लिंक' या तारखेपासून सुरू?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ आणखीन कमी होणार आहे. कारण, लवकरच 'मिसिंग लिंक' पूलाचे प्रवाशांच्या सेवेत दाखल होतोय.
मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी बांधला गेलेल्या 'मिसिंग लिंक' पूलाचे काम आता शेवटच्या टप्प्यामध्ये आलेले आहे. लवकरच हा पूल प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. पूलाचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले असून पुढच्या एक ते दीड महिन्यांमध्ये 'मिसिंग लिंक' पूल सुरू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. एका अर्थाने मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बातमीच म्हणता येईल.
बहुप्रतिक्षित मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचा विस्तार प्रकल्प अखेर यावर्षी 1 मे पर्यंत खुला होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची मुंबई- पुणेकर वाट पाहत होते, आता अखेर हा क्षण समोर आला आहे. 99 टक्के काम आता पूर्ण झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' प्रकल्प सुरू झाल्यानंतर मुंबई आणि पुण्यातील अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे तब्बल 25 ते 30 मिनिटांची बचत होणार आहे.
advertisement
खंडाळ्याचा घाट टाळण्यासाठी तयार करण्यात आलेला एकूण 13 किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. त्यात एकूण 650 मीटर लांबीचा केबल ब्रीजचा समावेश आहे. खरंतर, 'मिसिंग लिंक'चे काम 2022 मध्येच पूर्ण होऊन ही मार्गिका सुरू होणं, अपेक्षित होते. मात्र अनेक कारणांमुळे कामाला विलंब झाला आहे. आता या मार्गिकेचे काम 15 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे MSRDC चे नियोजन आहे. ही मार्गिका 1 मे 2026 रोजी सेवेत दाखल करण्याचे अपेक्षित आहे. अधिकाऱ्यांच्या मते, प्रकल्पाचा गुंतागुंतीचा भूप्रदेश, लोणावळा- खंडाळा खोऱ्यातील खोल बोगदे आणि उन्नत संरचना यांसारख्या आव्हानात्मक गोष्टींमुळे कामाला उशीर झाला. 6695 कोटी खर्चून मुंबई- पुणे 'मिसिंग लिंक' प्रोजेक्ट बनवण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 10:43 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Pune expressway: मुंबईहून पुण्याला आता 30 मिनिटांआधी पोहोचा!, 'मिसिंग लिंक' या तारखेपासून सुरू?








