Maharashtra Kesari : सिकंदर शेखची फायनलमध्ये धडक, पैलवान सुदर्शन कोतकर चितपट, शेवटच्या सामन्यात कुणाशी भिडणार?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सिकंदर शेखने अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकरचा 4-3 अशा गुण फरकानी पराभव केला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून सिकंदर शेखने फायनलमध्ये धडक मारली आहे.
Maharashtra Kesari 2026, Sikandar Shaikh vs Sudarshan Kotkar पुणे वाघोली : रामकृष्ण अण्णा सातव पाटील आयोजित 68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती विभागात पार पडलेल्या सामन्यात सिकंदर शेखने बाजी मारली आहे. सिकंदर शेखने अहिल्यानगरच्या सुदर्शन कोतकरचा 4-3 अशा गुण फरकानी पराभव केला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून सिकंदर शेखने फायनलमध्ये धडक मारली आहे.
माती विभागात हिंगोलीचा सिकंदर शेख आणि अहिल्यानगरचा सुदर्शन कोतकर याच्यात लढत पार पडली. ही लढत अत्यंत अटीतटीची पार पडली.या लढतीत सूरूवातीच्या मिनिटाला कुणालाचा गुण मिळाले नाही त्यामुळे पंचानी सिकंदर शेखला वॉर्निग दिली 30 सेकंदात अॅक्टीव्हीटी पिरीयड गुण घ्या नाहीतर प्रतिस्पर्ध्यांला 1 गुण मिळणार. याचा फायदा घेत सुदर्शनने पॅसिव्ह टॅकल 1 गुण आणि ताबा मिळवून 2 गुण असे एकूण 3 गुण मिळवले. त्यात सिकंदर शेखने प्रयत्न केला पण त्याला पहिल्या फेरीत एकही गुण मिळाला नाही तर सुदर्शन 3 गुणांसह आघाडीवर होता.
advertisement
दुसऱ्या फेरीत सिकंदर शेखने आक्रामक सुरूवात केली. पण सुदर्शनला गुण मिळवता आले नाही त्यामुळे पंचांनी त्याला वॉर्निंग दिली. 30 सेकंदात अॅक्टीव्हीटी पिरीयड गुण घ्या नाहीतर प्रतिस्पर्ध्यांला 1 गुण देणार. सुदर्शननने गुण न घेतल्यामुळे सिकंदरला एक गुण देण्यात आला. त्यानंतर त्याने आणखी दोन गुण मिळवले. त्यानंतर शेवटचा मिनिटं उरला असताना समसमान 3-3 गुण होते. शेवटी सामन्यात 49 सेकंद बाकी असताना सिकंदर शेखने सुदर्शन बाहेर ढकलले त्यामुळे त्याला एक गुण मिळाला होता. अशाप्रकारे सिकंदर शेखने 4 गुणासंह आघाडी घेत सामना जिंकला होता.
advertisement
सिकंदर शेखने सेमी फायनल सामन्यात हिल्यानगरच्या सुदर्शन कोतकरचा 4-3 अशा गुण फरकानी पराभव केला आहे. त्यामुळे हा सामना जिंकून सिकंदर शेखने फायनलमध्ये धडक मारली आहे. आता फायनलमध्ये त्याची लढत ही महेंद्र गायकवाडसोबत असणार आहे.या सामन्यात कोण बाजी मारतो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 21, 2026 10:15 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Maharashtra Kesari : सिकंदर शेखची फायनलमध्ये धडक, पैलवान सुदर्शन कोतकर चितपट, शेवटच्या सामन्यात कुणाशी भिडणार?








