advertisement

योगा ट्रेनर बनली हिरोईन! एकाच हिरोची गर्लफ्रेंड, पत्नी आणि आईही; आज आहे 133 कोटींची सुपरस्टार

Last Updated:
Actress : कोणतंही फिल्मी बॅकग्राऊंड नसलेली एक साधी योगा ट्रेनर फिल्ममध्ये हिरोईन म्हणून येते, एकाच हिरोसोबत तीन वेगवेगळ्या भूमिका करते आणि ती एक सुपरस्टार बनते.
1/7
तिचा जन्म मंगळुरूत झाला. फिल्ममध्ये येण्यापूर्वी ती बंगळुरूमध्ये एक योग प्रशिक्षक होती. तिने भरत ठाकूर यांच्यासारख्या प्रसिद्ध योगगुरूंकडून प्रशिक्षण घेतलं, नंतर इतरांनाही शिकवू लागली. योगाचे वर्ग घेत असतानाच ती साधं जीवन जगत होती.

2/7
एका चित्रपट निर्मात्याने तिला चित्रपटसृष्टीत आणलं आणि तिचं आयुष्य बदललं.  कोणतंही फिल्मी बॅकग्राऊंड नाही. लोकांना योगासन आणि प्राणायम शिकवणार एक सामान्य योग ट्रेनर किंवा योग प्रशिक्षिका. जिने सिनेसृष्टीत एंट्री मारली आणि आता ती एक मोठी स्टार बनली आहे.

3/7
तिच्या सौंदर्याने प्रेक्षक घायाळ होतात. तिच्या चेहऱ्यावरील भाव प्रेक्षकांना आकर्षित करतात. विशेष म्हणजे तिने स्वतःला ग्लॅमरस भूमिकांपुरते मर्यादित ठेवलं नाही तर सशक्त आणि विविध प्रकारच्या भूमिका साकारून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.

4/7
2005 साली तिची पहिली फिल्म रिलीज झाली आणि ती तेव्हाच फेमस झाली. 2 दशकांहून अधिक काळ तिनं आपलं स्टारडम टिकवून ठेवलं आहे. तिने साऊथमधील प्रत्येक बड्या स्टारसोबत काम केलं आहे पण एका सुपरस्टारसोबत तिची खास केमिस्ट्री होती. या एकाच हिरोची ती गर्लफ्रेंड बनली, पत्नी झाली आणि अगदी त्याच्या आईची भूमिकाही तिने साकारली.

5/7
तिची सध्याची एकूण संपत्ती अंदाजे 133 कोटी रुपये आहे. ती एका चित्रपटासाठी 6 कोटींहून अधिक मानधन घेते आणि तिचं मासिक उत्पन्न अंदाजे 1 कोटी रुपये आहे. ब्रँड एंडोर्समेंटमधून ती वर्षाला 12 कोटी रुपये कमावते. हैदराबादमधील जुबली हिल्स इथं 12 कोटी रुपयांचं एक आलिशान घर आणि शहराबाहेर एक फार्महाऊस आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये टोयोटा कोरोला अल्टिस, ऑडी क्यू5, ऑडी ए6, जीप कंपास आणि बीएमडब्ल्यू 6 अशा लक्झरी गाड्या आहेत.

6/7
ही आहे प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शेट्टी. जिला बाहुबली फिल्ममुळे राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आणि अनेक पुरस्कारही तिने मिळवले. 'बाहुबली: द बिगिनिंग' आणि 'बाहुबली: द कन्क्लुजन'मध्ये तिने प्रभासची पत्नी आणि महेंद्र बाहुबलीची आई देवसेनाची भूमिका साकारली. 'अरुंधती'सारख्या स्त्री-केंद्रित चित्रपटांमधून तिने एकटीने मुख्य भूमिका साकारण्याची आपली क्षमता सिद्ध केली.

7/7
अनुष्काचा 'घाटी' हा चित्रपट प्रदर्शित झाला, पण त्याने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली नाही. यानंतर, तिने सोशल मीडिया आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून ब्रेक घेतला आहे, पण ती लवकरच मोठ्या पडद्यावर परतणार आहे. जयसूर्यासोबत 'कथानार - द वाइल्ड सॉर्सर' या चित्रपटातून मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement