advertisement

पुणे रेल्वेचा हायस्पीड धमाका! 925 पैकी 588 किमी दुहेरीकरण पूर्ण; आता या महत्त्वाच्या मार्गांवर प्रवाशांचा प्रवास सुसाट

Last Updated:

पुणे रेल्वे विभागाने पायाभूत सुविधांच्या बाबतीत मोठी भरारी घेतली आहे. विभागातील एकूण 925 किमी लोहमार्गापैकी तब्बल 588 किमीचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे.

925 पैकी 588 किमी दुहेरीकरण पूर्ण (फाईल फोटो)
925 पैकी 588 किमी दुहेरीकरण पूर्ण (फाईल फोटो)
पुणे: पुणे रेल्वे विभागाने पायाभूत सुविधांच्या बाबतीत मोठी भरारी घेतली आहे. विभागातील एकूण 925 किमी लोहमार्गापैकी तब्बल 588 किमीचे दुहेरीकरण पूर्ण झाले आहे. विशेषतः पुणे-मिरज आणि दौंड-मनमाड यांसारख्या अत्यंत व्यस्त मार्गांचे काम मार्गी लागल्याने रेल्वे गाड्यांचा वेग वाढणार असून प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
प्रवाशांना आणि मालवाहतुकीला मोठा दिलासा
पुणे रेल्वे विभाग हा मध्य रेल्वेचा एक कणा मानला जातो. पुणे, दौंड, मिरज, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि शिर्डी यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांना जोडणाऱ्या या मार्गांवर प्रवासी आणि मालगाड्यांची मोठी वर्दळ असते. यापूर्वी मार्ग एकेरी असल्याने गाड्यांना 'क्रॉसिंग'साठी तासनतास थांबावे लागत असे. मात्र, आता दुहेरीकरणामुळे ही अडचण दूर झाली आहे.
advertisement
वेळेची बचत: गाड्यांना आता वाटेत थांबावे लागणार नसल्याने प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. दौंड कॉर्ड लाईनमुळे गाड्यांना जंक्शनमध्ये न जाता थेट मार्गस्थ होता येत आहे. औद्योगिक आणि कृषी मालवाहतूक जलद झाल्याने व्यापारी वर्गाला मोठा फायदा होणार आहे.
उर्वरित कामे युद्धपातळीवर
पुणे-मिरज मार्गाचे काम पूर्ण झाले असून, दौंड-मनमाड मार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. अहिल्यानगर ते बीड आणि लोणंद ते फलटण हे मार्ग सध्या एकेरी असले तरी, संपूर्ण विभागात दुहेरीकरणाचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहेरा यांनी दिली आहे. भविष्यात वाढणारी गर्दी लक्षात घेता, हे बळकटीकरण रेल्वेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे रेल्वेचा हायस्पीड धमाका! 925 पैकी 588 किमी दुहेरीकरण पूर्ण; आता या महत्त्वाच्या मार्गांवर प्रवाशांचा प्रवास सुसाट
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement