advertisement

Ashok Kharat Case: अशोक खरातला वाचवण्यासाठी नाशिक पोलिसांची फिल्डिंग? बड्या अधिकाऱ्यासोबतचा फोटो समोर

Last Updated:

Ashok Kharat Case : राजकारणी मंडळींसोबत पोलीस दलातील बडे अधिकारीदेखील आरोपी अशोक खरातने आपल्या जाळ्यात ओढल्याची चर्चा रंगली आहे. खरातला वाचवण्यासाठी पोलिसांनीच फिल्डिंग लावली होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशोक खरातला वाचवण्यासाठी नाशिक पोलिसांची फिल्डिंग? बड्या अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल
अशोक खरातला वाचवण्यासाठी नाशिक पोलिसांची फिल्डिंग? बड्या अधिकाऱ्याचा फोटो व्हायरल
नाशिक : नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि गुरू कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आहे. अशोक खरातचे कारनामे आता समोर येत असून धक्कादायक माहिती समोर येण्यासोबत गंभीर आरोप देखील होऊ लागले आहेत. भोंदू कॅप्टन खरातविरोधात वर्षभरापूर्वीच तक्रारी आल्या. मात्र, पोलिसांकडून त्यावर कारवाई झाली नसल्याचे म्हटले जात आहे. राजकारणी मंडळींसोबत पोलीस दलातील बडे अधिकारीदेखील आरोपी अशोक खरातने आपल्या जाळ्यात ओढल्याची चर्चा रंगली आहे. खरातला वाचवण्यासाठी पोलिसांनीच फिल्डिंग लावली होती का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी एक फोटो पोस्ट करत मोठा आरोप केला आहे.
वादग्रस्त कॅप्टन अशोक खरात यांचा एक फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी हा फोटो ट्विट आणि फेसबुकवर शेअर करत नाशिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा

तृप्ती देसाई यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, "नाशिकचे IG दत्तात्रय कराळे यांच्यासोबत कॅप्टन अशोक खरात याचा फोटो मला प्राप्त झाला आहे. गेल्या वर्षी खरातवर गुन्हा का दाखल झाला नाही? याचे उत्तर या फोटोत दडलेले असावे. नाशिक परिक्षेत्राचे IG स्वतः कराळे असल्याने खरातला पाठीशी घातले गेले, अशी माहिती मला फोनवरून मिळाली आहे."
advertisement
देसाई यांनी पुढे संताप व्यक्त करताना म्हटले की, महिलांबाबत गैरवर्तन करणाऱ्या व्यक्तीला पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी असे पाठीशी कसे घालू शकतात? हे अत्यंत दुर्दैवी आहे.

पोलीस प्रशासनात खळबळ

अशोक खरात यांच्यावर यापूर्वी गंभीर आरोप झाले होते, मात्र त्यावर कारवाई का झाली नाही, याबाबत आता संशयाचे धुके गडद झाले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासोबतचा फोटो समोर आल्याने 'वरदहस्त' कोणाचा, अशी चर्चा नाशिक विभागात सुरू झाली आहे. या प्रकरणाने पोलीस दलाची प्रतिमा मलिण होत असल्याचा आरोपही होत आहे. अद्याप यावर पोलीस प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Kharat Case: अशोक खरातला वाचवण्यासाठी नाशिक पोलिसांची फिल्डिंग? बड्या अधिकाऱ्यासोबतचा फोटो समोर
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement