विवाहित पुतणीला गाठलं, गुंगीचं औषध पाजलं अन्..., चुलत्याच्या भयंकर कृत्यानं बीडमध्ये संताप
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Beed News: पीडित मुलीने ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती. परंतु माहेरी आल्यानंतर तिने घडलेली घटना आई, वडिलांना सांगितली.
बीड: गेल्या काही काळात बीडमध्ये महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता केज तालुक्यातून एक संतापजनक प्रकार पुढे आला आहे. 50 वर्षीय चुलत्याने 19 वर्षीय विवाहित पुतणीला पाण्यातून गुंगीचे औषध पाजून अत्याचार केले. तब्बल पाच महिन्यानंतर ही घटना उघडकीस आली असून युसुफवडगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर 2025 रोजी 50 वर्षीय चुलत चुलत्याने पाण्यातून गुंगीचे औषध देत तरुणीवर अत्याचार केले. तसेच ही गोष्ट कोणालाही सांगितली तर तुझ्या आई, वडिलांना जीवे मारून टाकीन अशी धमकी दिली होती. त्यामुळे पीडित मुलीने ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती. परंतु माहेरी आल्यानंतर तिने घडलेली घटना आई, वडिलांना सांगितली.
advertisement
दरम्यान, शनिवारी सायंकाळी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून युसूफवडगाव पोलिस ठाण्यात चुलत्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंद झाला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भारत बर्डे पुढील तपास करीत आहेत.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 8:29 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
विवाहित पुतणीला गाठलं, गुंगीचं औषध पाजलं अन्..., चुलत्याच्या भयंकर कृत्यानं बीडमध्ये संताप








