मुळशीत लाल रंगाचा मोठा बंगला; अचानक पोलिसांनी उघडलं दार अन्...30 जणांचं सुरू होतं नको ते कांड, मोठी कारवाई
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
'एस.पी.एफ. व्येंकीज' कंपनीलगत असलेल्या एका लाल रंगाच्या बंगल्यात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू होता. पोलिसांनी या ठिकाणी अचानक छापा टाकला.
पुणे : मुळशी तालुक्यातील उरवडे परिसरात सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर पुणे ग्रामीण पोलिसांनी धाडसी कारवाई केली आहे. उरवडे ते मुकाईवाडी रस्त्यावरील एका बंगल्याच्या पत्रा शेडमध्ये सुरू असलेल्या या अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल ३० जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, अवघ्या आठ दिवसांपूर्वीच मुळशीत अशाच प्रकारची दुसरी मोठी कारवाई करण्यात आली होती.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, 'एस.पी.एफ. व्येंकीज' कंपनीलगत असलेल्या एका लाल रंगाच्या बंगल्यात मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू होता. गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार तुषार भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी या ठिकाणी अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पत्त्यांच्या कॅटसह इतर साहित्य हस्तगत केले आहे.
advertisement
पिंपरी-चिंचवड ते कोथरूडपर्यंतचे खेळाडू ताब्यात
या छाप्यात ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये मुळशीसह पिंपरी, चिंचवड, कोथरूड, वारजे, हडपसर आणि पाषाण परिसरातील प्रतिष्ठित भागातील व्यक्तींचा समावेश आहे. क्लबचालक संतोष नथु कंधारे (रा. आंदेशे) याच्यासह एकूण ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये व्यावसायिक आणि नोकरदार वर्गाचाही समावेश असल्याचे समजते.
मुळशीत जुगार अड्ड्यांचे जाळे?
गेल्या आठवड्यात मुगावडे ते चाले दरम्यानच्या 'निवांत व्हिला' येथे पोलिसांनी ४० जणांना पकडले होते. त्यानंतर लगेचच झालेली ही दुसरी मोठी कारवाई असल्याने मुळशी तालुक्यात जुगार अड्ड्यांचे जाळे पसरल्याचे स्पष्ट होत आहे. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 8:20 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
मुळशीत लाल रंगाचा मोठा बंगला; अचानक पोलिसांनी उघडलं दार अन्...30 जणांचं सुरू होतं नको ते कांड, मोठी कारवाई







