advertisement

बँकेच्या नावाने ईमेल आल्यास सावधान! लिंकवर क्लिक करण्यापूर्वी लक्षात ठेवा या 3 गोष्टी 

Last Updated:

सध्या डिजिटल युग सुरू आहे. लाइटबिल पासून तर रोजच्या 10 रुपयांच्या वस्तू खरेदीपर्यंत सर्वच आता ऑनलाइन केलं जातंय. असं असताना ऑनलाइन फ्रॉडचा धोकाही वाढलाय. 

अॅप्स फिशिंग ईमेल्स
अॅप्स फिशिंग ईमेल्स
नवी दिल्ली : सध्याच्या काळात ऑनलाइन बँकिंगचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. यामुळेच आता बँकिंगच्या कामासाठी पूर्वीसारख्या लांब-लांब रांगा लावायची गरज नाही. एका क्लिकवर आपली सर्वच कामं होतं आहेत. हे आपल्या खुप सोयीचं झालंय असलं तरीही याचे काही दुष्परिणामही आहेत. ते म्हणजे सायबर फ्रॉड करणारे आता सहज आपल्याला फसवू शकतात. ते विविध ट्रिक्स वापरुन बँकिंग ग्राहकांना आपल्या जाळ्यात ओढताय आणि कोट्यवधींना चुना लावताय.
सध्या हॅकर्स हे बँकेच्या नावाने बनावट ईमेल पाठवून लोकांच्या महेनतीच्या कमाईवर डल्ला मारताय. पण यात घाबरायचं अजिबात कारण नाही. कारण आपण थोडंही सावध राहिलो तर आपले मेहनतीचे पैसे आपल्याजवळच राहू शकतात. पण यासाठी सतर्क राहावं लागेल. हॅकर्स सध्या बँकिंग  ग्राहकांवर कसा निशाणा सायधाय पाहूया...
फिशिंग म्हणजे काय?
फिशिंगमध्ये हॅकर्स तुम्हाला बँकेच्या नावाने ईमेल पाठवतात. यामध्ये लिहिलं जातं की, 'तुमचं अकाउंट ब्लॉक होणार आहे.' किंवा मग लिहितात की, 'तुम्हाला मोठे रिवॉर्ड पॉइंट्स मिळालेय.' ईमेलमध्ये एक लिंक पाठवली जाते, तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताच एका बनावट वेबसाइटवर पोहोचता. ती हुबेहूब बँकिंग वेबसाइटप्रमाणे दिसते. तुम्ही तुमचा बँकिंग आयडी आणि पासवर्ड टाकताच हॅकर्सजवळ तुमची सर्व माहिती पोहोचते.
advertisement
लिंकवर क्लिक करण्यापूर्वी 3 महत्वाच्या गोष्टी चेक करा
सेंडरचा ईमेल आयडी : तुम्हाला ज्या व्यक्तीचा ईमेल आला त्याच्या नावावर नाही तर ईमेल आयडीवर लक्ष द्या. बँक नेहमी आपल्या अधिकृत डोमेन आयडी (@hdfcbank.com किंवा @sbi.co.in) नेच पाठवतात. बनावट ईमेलची नावं ही अनेकदा मोफत सर्व्हिस म्हणजेच @gmail.com, @outlook.com किंवा  customersupport@bank-login.com  असे असतात.
advertisement
भाषेसह व्याकरणाच्या चुका : बँकेचे अधिकृत मेसेज व्यावसायिक पद्धतीने लिहितात. पण ईमेलमध्ये स्पेलिंक मिस्टेक असतील, व्याकरणाच्या चुका असतील किंवा तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असेल. उदा. 'पुढील 1 तासात लिंकवर क्लि करा अन्यथा अकाउंट बंद होईल.' तर समजून घ्यायचं की, हे बनावट आहे. बँका कधीच तुम्हाला अशा घाबरवून पर्सनल माहिती मागत नाहीत.
advertisement
UPR आणि सुरक्षित वेबसाइट : ईमेलमधील किंवर क्लिक करण्यापूर्वी माउसचा कर्सर त्यावर न्या. (पण क्लिक करु नका) खालच्या बाजूला तुम्हाला लिंकचा अ‍ॅड्रेस दिसेल. वेबसाइटचा अ‍ॅड्रेस http:// पासून सुरू होत असल्यास ती असुरक्षित असते. सुरक्षित बँकिंग वेबसाइट नेहमी https:// पासूनच सुरू होते. S चा अर्थ सिक्योर असा होतो. एवढंच नाही तर अ‍ॅड्रेसच्या बारमध्ये एक कुलूपचं चिन्हही असतं.
advertisement
फिशिंगपासून बचाव कसा करायचा?
  • संशतिय लिंकवर क्लिक करू नका.
  • OTP, PIN आणि पासवर्ड कधीच शेअर करू नका.
  • ईमेल पाठवणाऱ्याचा ID तपासा.
  • 'लेगच करा, अन्यथा अकाउंट बंद होईल' असा मेसेज आल्यास सावध व्हा.
  • फक्त अधिकृत वेबसाइट किंवा अ‍ॅप वापरा.
  • टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करा.
  • अँटी-व्हायरस आणि फोन अपडेट ठेवा.
  • संशयास्पद मेसेज लगेच रिपोर्ट करा.
  • पब्लिक Wi-Fi बँकिंग करू नका.
  • नेहमीच अकाउंट चेक करा.
advertisement
चुकून लिंकवर क्लिक झालं तर काय?
तुम्ही चुकून एखाद्या बनावट लिंकवर क्लिक केल्यास लगेच बँकेच्या कस्टमर केयरवर कॉल करा. पासवर्ड चेंज करा. अकाउंटही ब्लॉक करा.
view comments
मराठी बातम्या/मनी/
बँकेच्या नावाने ईमेल आल्यास सावधान! लिंकवर क्लिक करण्यापूर्वी लक्षात ठेवा या 3 गोष्टी 
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement